२२ वर्षीय तरुणाची आधुनिक शेतीतील क्रांती: एरोपोनिक्स तंत्राने केशर लागवड करून बनला लाखोपती

नंदुरबार: स्वप्नांना वयाची सीमा नसते, हे सिद्ध करून दाखवणारा २२ वर्षीय तरुण हर्ष पाटील आता नंदुरबारच्या युवा शेतकऱ्यांमध्ये (farmer)एक प्रेरणास्रोत ठरला आहे. हर्षने आपल्या कौटुंबिक पारंपरिक शेतीच्या समस्यांना तोंड देत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केशराची लागवड करून लाखो रुपयांची कमाई करण्यास सुरुवात केली आहे.

हर्ष पाटील, एक स्मार्ट आणि प्रयोगशील युवक, नेहमीच नवनवीन प्रयोग करण्याची आवड ठेवतो. पारंपरिक पिकांच्या नुकसानीमुळे हर्षने एरोपोनिक्स तंत्रज्ञानाचा अवलंब करत केशराची लागवड सुरू केली. या तंत्राद्वारे मातीशिवाय झाडांची वाढ होते, आणि नियंत्रित वातावरणात हवेतूनच पोषक तत्वांचा पुरवठा केला जातो. हर्षने एका छोट्या खोलीत हा सेटअप तयार करून, त्यात ह्युमिडिफायर आणि एअर कंडिशनर्ससारख्या उपकरणांचा वापर करून योग्य हवामान निर्माण केले.

पहिल्याच प्रयत्नात हर्षने ३५० ग्रॅम मोगरा जातीचे केशर पिकवून मोठा नफा मिळवला. या यशामुळे हर्षने आपले पाय रोवले आणि आज तो लाखो रुपयांचा व्यवसाय करीत आहे. हर्षच्या यशाची कहाणी ऐकून अनेक शेतकरी त्याच्या संपर्कात आले आहेत. हर्षने आतापर्यंत ५० हून अधिक शेतकऱ्यांना ऑनलाइन कार्यशाळांद्वारे प्रशिक्षण दिले आहे.

हर्ष पाटीलच्या या यशाने आधुनिक शेतीतील संभाव्यतेचे एक नवे दालन उघडले आहे, आणि तो आता ग्रामीण भागातील तरुणांसाठी एक आदर्श बनला आहे.

हेही वाचा :

जयंत पाटलांची फडणवीसांवर कडवी टीका; “महाराष्ट्राच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष”

‘CA’ पदवीधरांच्या कमी पगारावरून TCS वादाच्या भोवऱ्यात, सोशल मीडियावर टीकेची झोड

चिमुकल्याने खेळण्याच्या नादात सापाला चावून ठार केलं; खेळता खेळता घडली घटना