शक्तिपीठ महामार्गाच्या संरेखनात बदल: शेतकऱ्यांच्या आक्षेपानंतर एमएसआरडीसीकडून नवा आराखडा तयार
नागपूर: नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या(highway) संरेखनात मोठा बदल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी महामार्गाच्या प्रस्तावित मार्गावर आक्षेप घेतल्यानंतर एमएसआरडीसीने हा निर्णय घेतला आहे.
८०५ किमी लांबीच्या या महामार्गाचे संरेखन आता पुन्हा नव्याने ठरवले जाणार आहे. परिणामी, पर्यावरणविषयक परवानगीसाठी केंद्र सरकारकडे सादर केलेला प्रस्ताव एमएसआरडीसीने मागे घेतला आहे. नवा आराखडा तयार करून परवानगीसाठी पुन्हा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे.
महामार्गाची संकल्पना नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर करण्यात आली असून, हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, आणि कोकण या चार प्रमुख विभागांना जोडणार आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या आणि स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे एमएसआरडीसीला संरेखनात बदल करावा लागला आहे.
या बदलामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या रचनात्मक प्रक्रियेत काहीसा विलंब होणार असला, तरी शेतकऱ्यांच्या आणि स्थानिकांच्या सहकार्याने हा प्रकल्प मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे. एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी या निर्णयाला दुजोरा दिला आहे.
हेही वाचा :
श्रावण महिन्यात मांसाहार का टाळावा? जाणून घ्या शाकाहारी आहाराचे वैज्ञानिक फायदे
२२ वर्षीय तरुणाची आधुनिक शेतीतील क्रांती: एरोपोनिक्स तंत्राने केशर लागवड करून बनला लाखोपती
जयंत पाटलांची फडणवीसांवर कडवी टीका; “महाराष्ट्राच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष”