लाडकी बहीण योजनेत मोठा दिलासा! आता ‘या’ महिलांना मिळणार थेट ४,५०० रुपये

राज्य सरकारच्या (government)’माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, योजनेच्या नियमांमध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे आता काही महिलांना थेट ४,५०० रुपये मिळण्याची शक्यता आहे.

  • कोणत्या महिलांना मिळणार ४,५०० रुपये?

३१ ऑगस्ट नंतर अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकत्रित ४,५०० रुपये मिळतील. यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे प्रत्येकी १,५०० रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे १,५०० रुपये असे एकूण ४,५०० रुपये समाविष्ट असतील.

  • योजनेच्या नियमांमध्ये आणखी कोणते बदल?

याशिवाय, योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. आता ५ एकर पेक्षा कमी जमीन असलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. यापूर्वी ही मर्यादा २ एकर होती.

  • महिलांमध्ये उत्साह

योजनेच्या नियमांमध्ये झालेल्या या बदलांमुळे महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. यामुळे आणखी मोठ्या संख्येने महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल, अशी अपेक्षा आहे.

सरकारकडून आवाहन

पात्र महिलांनी त्वरित अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर आहे.

हेही वाचा :

चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार; दोषीला 25 वर्षांची सक्तमजुरी

स्कायवॉकवर प्रेमी जोडप्यांची वसुली करणारा तोतया पोलिस अटक

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन बदलले: बांगलादेशाऐवजी अमिरातीत रंगणार स्पर्धा