लाडकी बहीण, भाऊनंतर आता ‘लाडका शेतकरी’ योजना; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

लाडकी बहीण, भाऊनंतर आता लाडका शेतकरी (farmer)योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीयं. बीडमध्ये आज राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कृषी महोत्सवास ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांच्या(farmer) पिकाला थेट मार्केट उपलब्ध करुन देणं हे महायुती सरकारचं काम आहे. आम्ही पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम करीत आहोत. आमच्या सरकारचं धोरण कष्टकरी, वारकरी, शेतकरी सुखी हेच आहे. त्यामुळे आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीयं.

आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली. त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली. आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार आहोत. सर्व भाऊ लाडके झाले, सर्व बहीणी लाडक्या झाल्या, आता शेतकरीही लाडका होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु करण्यात येत आहे. विविध नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. अशातच मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरु केलीयं. या योजनेची चर्चा सुरु असतानाच आता लाडकी शेतकरी योजनेची घोषणा करण्यात आलीयं. त्यामुळे आता या योजनेचीही राज्यभरात चांगलीच चर्चा होईल.

हेही वाचा :

क्रिस्टियानो रोनाल्डोच्या यूट्यूब चॅनलने सुरु करताच गाजवले महाविक्रम..

सुप्रिया सुळेंनी अजित पवारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण उत्तर मिळालं नाही; सरकारवर केल्या कडव्या टिप्पण्या

राज्य सरकारचा मोठा निर्णय: प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले अध्यक्ष