समरजितसिंह तुतारी फुंकण्यावर ठाम या तारखेला शरद पवार गटात प्रवेश

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून भाजप, शिवसेना (trumpet)शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येणार आहेत.पाच वर्षांपूर्वीची निवडणूक समरजितसिंह यांनी अपक्ष लढवून ८८ हजार मते घेतली, पण त्यावेळी संजय घाटगे हे शिवसेनेचे उमेदवार होते आणि तिरंगी लढतीत मुश्रीफ यांनी बाजी मारली.कागल विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढायचे, की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची ‘तुतारी’ फुंकायची हा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा निर्णय उद्या ता. २३ होणार आहे. त्यासाठी घाटगे यांनी आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक शाहू कारखाना कार्यस्थळावर बोलावली आहे. या बैठकीतच यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

अपक्ष लढणे आव्हानात्मक असल्याने आणि विरोधकांकडे तगडा उमेदवार नसल्याने ते ‘तुतारी’ फुंकण्यावर ठाम असल्याचे बोलले जाते. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येणार आहेत. त्यात विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्या पक्षाला ती जागा देण्याचे सूत्र जवळपास निश्‍चित आहे. या सूत्रानुसारच कागल विधानसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ हे उमेदवार हे जवळपास निश्‍चित आहे.

यासंदर्भातील हालचाली वाढल्यानंतर या मतदारसंघातून दहा वर्षांपासून तयारी केलेले घाटगे अस्वस्थ आहेत. त्यातच पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला महत्त्‍व असलेल्या या मतदारसंघाचे माजी आमदार संजय घाटगे यांनी आपली तलवार म्यान करून मुश्रीफ यांना पाठिंबा दिला. त्याच्या जोडीला माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनीही युती धर्म पाळण्याचे संकेत दिले आहेत. त्यातून समरजितसिंह यांच्या अस्वस्थेत आणखी भर पडली आहे.

पाच वर्षांपूर्वीची निवडणूक समरजितसिंह यांनी अपक्ष लढवून ८८ हजार मते घेतली, पण त्यावेळी संजय घाटगे हे शिवसेनेचे उमेदवार होते आणि तिरंगी लढतीत मुश्रीफ यांनी बाजी मारली. आता अपक्ष लढणे तसे आव्हानात्मक आहे, याची जाणीव समरजितसिंह यांनाही आहे. त्यातूनच त्यांनी पर्यायांची (trumpet)चाचपणी सुरू केली आहे. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट असो किंवा काँग्रेसचे अस्तित्व फारसे नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा एकमेव पर्याय आहे. त्यादृष्टीने समरजितसिंह यांची पावले पडताना दिसत आहेत.

‘तुतारी’ घेतली तर या मतदारसंघात शरद पवार यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबरच काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व गडहिंग्लजमधील जनता दलाची ताकद त्यांच्या मागे असेल हे गणित ओळखूनच त्यांनी त्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर समरजितसिंह घाटगे यांनी आपल्याला मानणाऱ्या गटाचा मेळावा उद्या ता. २३ शाहू कारखाना कार्यस्थळावर बोलावला आहे. हा मेळावा म्हणजे कारखान्याची सर्वसाधारण सभाच असेल. त्यातच घाटगे यांनी ‘तुतारी’ फुंकावी असे नियोजन आहे. त्यामुळे या मेळाव्यातच त्यांच्याकडून ‘तुतारी’ हातात घेऊन विधानसभेचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे.

या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर समरजितसिंह घाटगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘मी काल मुंबईत होतो, त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च-तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या भेटीत मतदारसंघातील सद्यस्थितीबाबत त्यांच्याशी चर्चा केली. उद्याच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेऊन निर्णय घेऊ. पण,  मुंबई भेटीत आपण खासदार शरद पवार यांची भेट घेतलेली नाही.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे ३ सप्टेंबरला कोल्हापुरात येत आहेत. शुक्रवारी ता. २३ होणाऱ्या मेळाव्यात भाजपला रामराम करून पक्ष बदलण्याचा निर्णय घाटगे यांनी घेतला तर ३ सप्टेंबरला कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात शरद पवार यांच्या (trumpet)उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्‍चित आहे. या मेळाव्यातूनच ते मुश्रीफ यांच्या विरोधात रणशिंग फुंकतील.

घाटगे प्रतिनिधीत्‍व करत असलेल्या शाहू कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जवळपास २९ गावांचा समावेश आहे. या गावांवर घाटगे गटाचे वर्चस्व आहे, याची प्रचिती २००९ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली आहे. घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर त्यांचा प्रभाव कोल्हापूर दक्षिणमध्येही दिसणार आहे. त्यातून भाजपचे संभाव्य उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांच्यासमोर हे मोठे आव्हान असेल.

कागलच्या राजकारणातील माजी आमदार संजय घाटगे यांनी एका कार्यक्रमात मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर ६ ऑगस्टला ‘सकाळ’च्या अंकात शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाऊन ‘तुतारी’ फुंकण्याची शक्यता असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हे वृत्त सध्या सुरू असलेल्या घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर तंतोतंत खरे ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

क्रिस्टियानो रोनाल्डोच्या यूट्यूब चॅनलने सुरु करताच गाजवले महाविक्रम..

सुप्रिया सुळेंनी अजित पवारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण उत्तर मिळालं नाही; सरकारवर केल्या कडव्या टिप्पण्या

राज्य सरकारचा मोठा निर्णय: प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले अध्यक्ष