फडणवीस-पवार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कोल्हापुरात कसोटी
माजी आमदार के. पी. पाटील बंडाच्या तयारीत आहेत. त्यामुळे महायुतीला (preparing)कोल्हापुरात धक्का पोहोचला आहे. इतकेच नव्हे तर भाजपचे नेते आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी देखील बंडाचे निशाण फडकवले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरात महायुतीत गळतीला सुरुवात झाली आहे. गुरुवारी ता.22 ऑगस्ट रोजी महायुतीचा मेळावा तपोवन मैदान येथे पार पडणार आहे.त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाउपाध्यक्ष ए. वाय पाटील यांनी राजीनामा दिला आहे.
माजी आमदार के. पी. पाटील बंडाच्या तयारीत आहेत. त्यामुळे महायुतीला कोल्हापुरात धक्का पोहोचला आहे. इतकेच नव्हे तर भाजपचे नेते आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी देखील बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यामुळे आज महायुतीच्या मेळाव्यात हे तिघेही उपस्थित राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची कसोटी लागणार आहे.महायुतीच्या (preparing)मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदासह पक्षाचा राजीनामा वरिष्ठ नेत्यांकडे सुपूर्द केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील बड्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर महायुतीमध्ये खळबळ माजली आहे.
तर भाजपचे नेते समरजीत घाटगे यांनी देखील भाजपला रामराम करण्याची तयारी ठेवली असून येत्या तीन सप्टेंबरला ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विधानसभेला इच्छुक असणारे पण उमेदवारी न मिळाल्याने हे सर्वजण नाराज आहेत. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार के. पी पाटील हे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीतील हे चौघे पक्षाला रामराम ठोकण्यावर ठाम आहेत.
मागील 10 वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे राजकीय प्रस्थ वाढवण्यासाठी इतर पक्षातील बडे पदाधिकार्यांची इनकमिंग करून घेतली होती. विधानसभा निवडणुकीचा शब्द देत अनेकांनी भाजप पक्ष प्रवेश करून घेतला होता. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मैत्रीपूर्ण आणि अपक्ष लढतीमुळे या भाजपमधील पदाधिकाऱ्यांची निराशा निर्माण झाली होती.
यंदा महायुतीमुळे पुन्हा एकदा या इच्छुकांची गोची झाली आहे. सलग दहा वर्षे जनतेची सेवा केल्यानंतर पदरी निराशा पडत असल्याने या भाजप पदाधिकाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. कागलमधून समरजीत घाटगे आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघातून राहुल देसाई यांनी पक्षाच्या विरोधात(preparing) बंड पुकारले आहे. हीच परिस्थिती राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहे.
राधानगरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला जात असल्याने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत सदस्यत्वचा राजीनामा दिला. तर के. पी. पाटील हे देखील बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील राष्ट्रवादीचे अस्तित्व जिल्ह्यात टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागणार आहे. मात्र, दोन बड्या नेत्यांनी पक्षाला बंडाचे निशाण दाखवल्यानंतर जिल्ह्याच्या पश्चिम भागात राष्ट्रवादीचा आव्हान संपुष्टात येण्याची भीती आहे. त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची खरे कसोटी या जिल्ह्यात लागणार आहे हे नक्की.
हेही वाचा :
क्रिस्टियानो रोनाल्डोच्या यूट्यूब चॅनलने सुरु करताच गाजवले महाविक्रम..
राज्य सरकारचा मोठा निर्णय: प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले अध्यक्ष