आधार नंबरशिवाय वर्च्युअल आयडीने होईल तुमचे काम, जाणून घ्या तयार करण्याची पद्धत

नवी दिल्ली: आधार कार्ड आजच्या घडीला प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. विविध सरकारी (govt)व खासगी कामांसाठी आधार नंबर देणे बंधनकारक असते. मात्र, गेल्या काही वर्षांत आधारशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने सरकारने आधार नंबर देण्याची सक्ती कमी करण्यासाठी आधार वर्च्युअल आयडीची सुविधा सुरू केली आहे.

आधार वर्च्युअल आयडी म्हणजे काय?

आधार वर्च्युअल आयडी हा 16 अंकी तात्पुरत्या स्वरूपाचा नंबर आहे. हा आधार नंबरचा पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो. वर्च्युअल आयडीच्या मदतीने आपली ओळख दाखवण्यासाठी मोबाईल नंबर किंवा बँक खात्याचा नंबर दिल्याशिवाय विविध सेवा वापरता येतात. या आयडीद्वारे आधार नंबर समजू शकत नाही, त्यामुळे हा अधिक सुरक्षित पर्याय ठरतो. प्रत्येक आधार नंबरसाठी फक्त एकच वर्च्युअल आयडी तयार केला जाऊ शकतो, जो किमान एक दिवस व्हॅलिड असतो आणि तो दररोज अपडेट करता येतो.

UIDAI कडून वर्च्युअल आधार आयडी कसा तयार करावा?

  1. UIDAI ची अधिकृत वेबसाइट उघडा: वेबसाइटवर जाऊन ‘आधार सेवा’ विभागात ‘वर्च्युअल आयडी जनरेटर’ या पर्यायावर क्लिक करा.
  2. आधार नंबर भरा: आपला आधार नंबर आणि सिक्योरिटी कोड भरा.
  3. OTP पाठवा: ‘सेंड OTP’ या पर्यायावर क्लिक करून OTP मिळवा.
  4. VID जनरेट करा: OTP भरल्यानंतर ‘जनरेट VID’ वर क्लिक करा आणि आपला वर्च्युअल आयडी तयार करा.

SMS द्वारे वर्च्युअल आयडी कसा तयार करावा?

आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून GVID आणि आधारच्या शेवटचे चार अंक लिहून 1947 या क्रमांकावर SMS पाठवा. उदाहरणार्थ, GVID1234 असे SMS पाठवल्यास तुम्हाला वर्च्युअल आयडी प्राप्त होईल.

mAadhaar ॲपद्वारे वर्च्युअल आयडी कसा तयार करावा?

  1. mAadhaar ॲप लॉगिन करा: ॲपमध्ये लॉगिन करून ‘जनरेट वर्च्युअल आयडी’ या पर्यायावर क्लिक करा.
  2. आधार नंबर भरा: आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरा.
  3. OTP रिक्वेस्ट करा: ‘ओटीपी रिक्वेस्ट’ वर क्लिक करा.
  4. VID जनरेट करा: ओटीपी मिळाल्यानंतर ‘जनरेट VID’ वर क्लिक करा आणि VID क्रमांक प्राप्त करा.

आधार वर्च्युअल आयडीच्या वापरामुळे आधार नंबरची गरज कमी होईल आणि त्याचबरोबर फसवणुकीचा धोका देखील कमी होईल. त्यामुळे आता तुमचे विविध व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोपे होणार आहेत.

हेही वाचा :

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शिंदे सरकारचा मोठा निर्णय, दिवसाही अखंडित वीजपुरवठा मिळणार

राज्यात लागू होणार नवीन पेन्शन योजना: मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

राहुल गांधींची मोदींवर सडेतोड टीका: “जातीजणगणनेचा आदेश जनतेने दिला आहे, पंतप्रधानांनी तो मान्य करावा”