धक्कादायक ! मूलबाळ होत नसल्याने पत्नीची निर्घृण हत्या
नागपूर : लग्नाला अनेक वर्षे होऊनही मूलबाळ होत नसल्याने पती-पत्नीमध्ये वाद(marriage) झाला होता. या वादातच संतप्त झालेल्या पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी पतीविरोधात कळमना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने नागपुरात एकच खळबळ उडाली आहे.
सबिरा बाबुलाल वर्मा (वय 40) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक(marriage) केली आहे. बाबुलाल जीवन वर्मा (वय 43, रा. रामभूमी सोसायटी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. बाबुलाल हा कळमना बाजारात हमाल असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा वर्षांपूर्वी सबिरासोबत त्याचे लग्न झाले होते. लग्नाला इतके वर्षे होऊनही त्यांना मूल नव्हते. यावरून बाबुलाल सबिराशी दररोज भांडत होता.
दारूच्या नशेत मारहाण, चारित्र्यावर संशयही ही नित्याचीच बाब झाली होती. सततच्या भांडणाला कंटाळून सबिरा दोनदा घर सोडून गेली होती. मात्र, बाबुलाल तिची समजूत घालून परत आणत होता. परत तिच्याशी भांडण करून मारहाण करत होता. मंगळवारी रात्रीही बाबुलाल दारूच्या नशेत घरी आला. त्याने मुल होत नसल्यावरून सबिराशी भांडण सुरू केल्यानंतर तिला मारहाण करू लागला.
याचदरम्यान सबिराच्या बहिणीचा मुलगा थानसिंग वर्मा याने तिला कॉल केला. वारंवार फोन केल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्याने बाबुलाल याला कॉल केला. बाबुलालने सबिराचा खून केल्याचे त्याला सांगितले. आधी तर त्याला विश्वासच बसला नाही. मात्र, सविराशी संपर्क होत नसल्याने संशय बळावला. तो सबिराच्या घरी पोहोचला असता दार आतून बंद होते. तेव्हा घडला प्रकार समोर आला.
हेही वाचा:
Infinix Zero 40 5G सिरीज आज होणार लाँच
‘दीपवीर’ चिमुकल्याचं स्वागत दणक्यात करणार! बाळाच्या जन्मानंतर 119 कोटींच्या घरात जाणार
भारतीय यूजर्सला मोठा झटका, YouTube Premium 58 टक्क्यांनी महाग