कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे घडलेल्या एका धक्कादायक (businessman) घटनेने व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यातील २४ वर्षीय चांदी व्यावसायिक शिवम निवास जाधव याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.शिवम जाधव हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील घोटी बुद्रुक गावचा रहिवासी असून त्याचे गावात चांदीचे दुकान होते. हुपरी येथील एका उद्योजकाशी त्याचे व्यावसायिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये चांदी खरेदीसंदर्भात व्यवहार झाला होता. त्या अनुषंगाने शिवमने सेलम येथून चांदी घेऊन हुपरीत संबंधित उद्योजकाच्या दुकानात येऊन पार्सल सुपूर्द केले.

मात्र, पार्सल उघडल्यानंतर त्यात चांदीऐवजी तांबे आढळल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. (businessman)वादानंतर शिवम दुकानाबाहेर गेला. काही वेळातच तो दुकानासमोर बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. तातडीने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेनंतर शिवमच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून त्याच्या वडिलांनी मृत्यूचे नेमके कारण समजावे यासाठी सखोल तपासाची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.

शिवमच्या चेहऱ्यावर काही जखमांचे चिन्ह आढळले असून(businessman) त्याच्या गाडीतून एक शीतपेयाची बाटलीही जप्त करण्यात आली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात कोणतीही शक्यता नाकारली जात नसून पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. शिवम हा एकुलता एक मुलगा होता आणि अविवाहित होता, त्यामुळे या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा :

संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनीवर अत्याचार

गर्लफ्रेंडसोबत हॉटेलवर गेला, शरीरसंबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू; कारण ऐकून पोलिसही हादरले

युद्ध थांबलं तरी इराणमध्ये भयानक स्फोट! हादरवून टाकणारी नवी अपडेट समोर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *