एअरपोर्टवर अचानक एका मुलीने बॅग खाण्यास केली सुरूवात…Video
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. लोक रातो रात फेमस (airport)होतात. फेमस होण्यासाठी असे काही करतात की अनेकांना आश्चर्यचकित करून सोडतात. अनेकदा मनोरंजात्मक व्हिडीओ पाहायला मिळतात. पण अनेकदा लोक विचित्र स्टंट करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एअरपोर्टवरचा असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तुम्ही अनेक खाण्या पिण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर(airport) पाहिले असतील. अनेक रोसिपींच्या व्हिडीओ देखील पाहिल्या असतील. पण हा व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. विमानतळावर एक मुलगी कशी तिची बॅग फोडते आणि सर्वांसमोर ती खायला लागते. मुलीचे हे कृत्य पाहून तिच्या आजूबाजूला बसलेले लोक प्रथम आश्चर्यचकित झाले पण काही वेळाने त्यांना समजले की ती तशी का करतेय? व्हिडीओला लोक प्रचंड पसंत करत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी तिच्या फ्लाइटची वाट पाहत आहे. यादरम्यान, ती अचानक तिची बॅग फोडते आणि खाऊ लागते. हा प्रकार पाहून तिच्या शेजारी बसलेल्या महिलांना आश्चर्याचा धक्का बसला. ही बॅग घेऊन ही तरुणी विमानतळावर फिरताना दिसत आहे.
व्हिडीओ पाहून असे वाटते की, तिला या व्हिडिओमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया पाहायच्या आहेत. ती अनेक ठिकाणी जाऊन बॅग फोडून खाते प्रथम एअरपोर्टवरील लोक तिला असे करताना पाहून चकित होतात. पण नंतर त्यांच्या लक्षात येते की, ती बॅग नसून केक आहे. वास्तविक मुलीने केकची बॅग तयार केली आहे. ती एअरपोर्टवरील लोकांना केक खायला देखील देते. सगळे तिला विचारत असतात की, तिने ते कसे बनवले.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओ सोशल मीडिया मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर mayaracarvalho अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ आत्तापर्यंत मिलिमयन लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे.
अनेकांनी तिला केकपासून बॅग कशी बनवली हाच प्रश्न विचारला आहे. एका यूजरने लिहिले आहे की, मी थांबून तिला खाण्यास मदत केली असती. तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘मला हा केक बनवण्याची रेसिपी दाखवा, तुम्ही कसा बनवता, मी त्यासाठी उत्सुक आहे.’ यांसारख्या अनेक मजेशीर कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.
हेही वाचा:
महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ; ‘या’ जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट
ऐन सणासुदीत महागाईचा तडका; कोथिंबीरच्या एका जुडीला 200 रुपयांचा भाव, तर…
आज शेवटच्या श्रावण सोमवारी ‘या’ राशींचं भाग्य उजळणार