किरिट सोमय्यांचा भाजपवर रोष: निवडणूक समितीच्या कामास नकार, सामान्य सदस्य म्हणूनच काम करण्याची मागणी!
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी विधानसभा निवडणुकीसाठी(election) भाजपच्या प्रचार समितीमध्ये काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांनी रावसाहेब दानवे आणि चंद्रशेखर बावनकुळेंना लिहिलेल्या पत्रात नाराजी व्यक्त करत, “माझ्या नावाची घोषणा मला विचारता न करता केली गेली, हे पूर्णपणे अमान्य आहे,” असं स्पष्ट केलं.
सोमय्यांनी भाजपचा सामान्य सदस्य म्हणूनच काम करण्याची इच्छा व्यक्त करत, “मी 2019 पासून सामान्य सदस्य म्हणून काम करतोय, आणि मला तसंच काम करू द्यावं,” असं नमूद केलं. ठाकरे सरकारचे घोटाळे उघड करताना आपल्यावर तीन वेळा हल्ले झाले तरीही मी पक्षासाठी लढा दिला, असं त्यांनी पुढे सांगितलं.
सोमय्यांनी या निर्णयावर ठाम राहत, निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचार समितीमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे, ज्यामुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणात नव्या चर्चांना वाव मिळाला आहे.
हेही वाचा:
विराट-अनुष्का करतात मोनोट्रॉफिक डाएट: काय आहे हा डाएट आणि वजन कमी करण्यासाठी किती प्रभावी?
“IND vs BAN: पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या बॉलरचा टीम इंडियाला इशारा, ‘याप्रमाणे खेळा’”
शिवाजी महाराजांची समाधी कुणी शोधली? मोहन भागवत यांच्या विधानाने नवा वाद