प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; संतापलेल्या तरूणीने आईला संपवले
मुंबई : रायगड जिल्ह्यात एका मुलीने स्वत:च्या आईची(mother) हत्या केल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार खालापूर तालुक्यातून समोर आलाय. तरूणीने जन्मदात्या आईची हत्या का केली? असा प्रश्न सर्वांना पडतोय. ही घटना केव्हा घडली? आईची हत्या करण्यामागे काय कारण होतं? हे आपण सविस्तर जाणून घेवू या.
खालापूर तालुक्यातील परखंदे येथील धनगरवाडामध्ये मुलीने जन्मदात्या आईची(mother) हत्या केल्याची घटना १० सप्टेंबर रोजी घडली होती. संगीता मारुती झोरे, अशी मृत महिलेची ओळख आहे. तरूणी प्रियकरासोबत शरीरसंबंध करत होती. आईने तिला रंगेहाथ पकडल्यामुळे तरूणी प्रचंड संतापली. रागाच्या भरात या तरूणीने आईचा खून केलाय.
आईच्या हत्या केल्याप्रकरणी खालापूर पोलिसांनी मुलगी भारती आणि तिचा प्रियकर संतोष दत्तात्रेय नांदगावकर यांना अटक केलीय. खालापूर न्यायालयाने या दोघांना १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संगीता झारे त्यांच्या दोन मुलींसह धनगरवाडामध्ये राहत होत्या. त्यांची मोठी मुलगी भारतीचे वावोशीतील संतोष नांदगावकर नावाच्या तरूणासोबत प्रेम प्रकरण आहे. तो तिला अनेकदा भेटण्यासाठी तिच्या घरी जात होती.
१० सप्टेंबर रोजी तरूणीचा प्रियकर संतोष हा तिच्या घरी आला होता. रात्रीच्या वेळी दोघांना तरूणीच्या आईने एकत्र पाहिले. नंतर आई आरडेल या भितीने भारती आणि संतोष यांनी तिला खाली पाडलं. नाकावर घोंगडीने दाब देत आईची हत्या केली. घटनेनंतर त्यांनी आईने आत्महत्या केल्याचा बनाव रचला.
संगीता यांचा मृतदेह घरामधील चुलीच्या ठिकाणी असलेल्या पाइपला साडीचा फास लावून लटकवला होता. परंतु या दोघांनी केलेल्या भयंकर कृत्याची भारतीची लहान बहीण साक्षीदार होती. त्यामुळे आरोपी तरूणीच्या लहान बहिणीने ही बाब पोलिसांना सांगितली. त्यामुळे या दोघांचं कृत्य उघड झालं.
हेही वाचा:
उच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त
‘या’ 5 राशींना अनंत चतुर्दशी पावणार, बाप्पा देणार सुख-समृद्धी!
महाराष्ट्राला मिळणार 6600 मेगावॅट वीज; अदानी समूह करणार वीज पुरवठा