लग्नानंतर 40 दिवसात नवऱ्याने ‘हे’ केलंच नाही… बायकोने थेट मागितला घटस्फोट

लग्न हे दोन जीवांचे, आत्म्याचे आणि मनाचे मिलन असते, असे म्हटले जाते. अजूनही देशात पारंपरिक लग्नपद्धतीनुसार (marriage) लग्न लावली जातात. ज्यानुसार लग्नाआधी कांद्यापोह्याचा कार्यक्रम आखून मोठयांच्या उपस्थितीत मुला-मुलीच्या लग्नाचा घाट घातला जातो.यामुळे नवरा-नवरीला लग्नानंतरच एकमेकांना ओळखायला मिळते. एकमेकांची आवड-निवड, सवयी या सर्व गोष्टी त्यांना लग्नानंतर समजू लागतात.

तुम्हाला तुमच्या जोडीदाराची वाईट सवय लग्नानंतर(marriage) समजली तर तुम्ही काय कराल? आम्ही तुम्हाला सांगतो की, उत्तर प्रदेशमधील एक नवविवाहित पत्नी आपल्या नवऱ्याच्या सवयीला कंटाळत अवघ्या 40 दिवसांतच घटस्फोट द्यायला निघाली आहे. ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. यानंतर आता प्रश्न असा पडतो की, नवऱ्याची ही सवय आहे तरी काय?

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक अजब प्रकार घडून आला ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या नवऱ्याच्या घाणेरड्या सवयीला कंटाळत पीडित पत्नीने थेट कायद्याचे दार ठोठावले. इथे तिने घटस्फोटासाठी जे कारण सांगितले ते ऐकून मात्र सर्वच आवाक् झाले. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला समजले की, तिचा नवरा रोज आंघोळ करत नाही. तो आठवड्यातून फक्त एकदा अंघोळ करतो. त्यामुळे त्याच्या अंगातून दुर्गंधी येत होती. महिलेने अनेकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. या महिलेने सांगितले की, तिच्या नवऱ्याने 40 दिवसांत फक्त 6 वेळा अंघोळ केली आहे.

यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या पतीच्या कुटुंबाविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल करत घटस्फोटाची मागणी केली. रिपोर्टनुसार, महिलेने आपले सासर सोडले असून ती सध्या आपल्या माहेरी राहत आहे. यानंतर पतीने आपली चूक लक्षात घेत पत्नीची माफी मागितली आणि पुन्हा असे करणार नाही, तसेच दररोज अंघोळ करण्याचे आश्वासनदेखील दिले.

पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. याचा एक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नवविवाहित दाम्पत्याचे नाते तुटण्यापासून वाचाचे, यासाठी त्यांचे समुपदेशन केले जात आहे. मात्र पत्नी यावर मानेल असे दिसत नाहीये. पत्नी आपल्या निर्णयावर ठाम आहे. दरम्यान घटस्फोटाचे हे अजब कारण ऐकून आता अनेकजण थक्क झाले आहेत. ही घटना आता देशभर मोठ्या वेगाने व्हायरल होत आहे. लोक यावर आपल्या मजेदार प्रतिक्रयादेखील व्यक्त करत आहेत.

हेही वाचा:

सौरव गांगुलीची पोलिसात धाव, दाखल केला मानहानीचा खटला

रेशनकार्डधारकांनो, ई-केवायसी करून घ्या; अन्यथा रेशन होईल बंद

सणासुदीच्या काळात खाद्य तेलाच्या किंमती वाढणार का?