इचलकरंजी महानगरपालिकेतील जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

इचलकरंजी – २०२४-२५ या शालेय वर्षातील महानगरपालिका स्तरावरील जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन आज इचलकरंजी महानगरपालिकेतील राजीव गांधी भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या स्पर्धेचे उद्घाटन इचलकरंजी महानगरपालिकेचे मुख्य लेखापाल विकास खोळपे साहेब आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा १४, १७ आणि १९ या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे.

उद्घाटन प्रसंगी विकास खोळपे साहेब यांनी आपल्या मनोगतातून मुलांमध्ये या क्रीडा प्रकारात वाढती रुची असल्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “तलवारबाजी या खेळात मुलांची संख्या पहिल्यापेक्षा वाढताना दिसत आहे. ही आनंदाची बाब आहे. पालक आणि शिक्षकांनी यासाठी अधिक प्रयत्न करून या खेळाच्या विकासासाठी योगदान द्यावे.”

या प्रसंगी क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे, प्रकाश रावळ, विनायक हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक हुबळे, इंदुमती स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. पाटील, सहा. क्रीडा अधिकारी संजय कांबळे, क्रीडा पर्यवेक्षक सचिन खोंद्रे, आकाश माने, श्याम कांबळे, माने मॅडम, संदीप नाईक, सचिन नाईक, जिल्हा पंच संदीप जाधव, उमेश पाटील, प्रियंका नाकील, सरस्वती देवडा, प्रवीण रावळ आणि इतर शाळांचे क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेचे सुत्रसंचालन क्रीडा समन्वयक श्याम कांबळे आणि माने मॅडम यांनी केले, तसेच माने मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. इचलकरंजीतील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला होता.

इचलकरंजी महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन मुलांमध्ये क्रीडाविषयी आवड निर्माण करणे आणि तलवारबाजी या खेळाला प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट ठेवून करण्यात आले.