अजित पवार पहिला बळी मग..; महायुतीचा मोठा प्लॅन, संजय राऊतांनी सगळचं सांगितलं
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या निवडणुकीचा (political consultant)संपूर्ण खर्च करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिंदे गटाकडून झारखंड, हरियाणा राज्यांच्या निवडणुकीसाठीही खर्च करुन घेतला जात आहे. हा खर्च केला तरच त्यांना मुख्यमंत्र पदावर ठेवायचं की नाही, याबाबत निर्णय घेऊ, असंही त्यांना सांगण्यात आले आहे. पैशांच्या थैल्या भरून दिल्लीला द्याव्या लागतात, म्हणजेच एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद हे पैशांच्या थैल्यांवर टिकून आहे, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत.
राज्याच्या विधानसभा निवडणुका(political consultant) जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत. तसतशा महायुतीतील अंर्तगत मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. अशातच महायुतीत अजित पवार यांना एकटे पाडण्याचे प्लॅनिंग सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. वरही संजय राऊतांनी निशाणा साधत सूचक विधान केले आहे. महायुतीत पहिला बळी अजित पवरा आणि दुसरा शिंदे गटाचा दिला जाईल, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहेत.
“भाजप आणि शिंदे गट एक नंबरचे कारस्थानी आणि कपटी लोक आहेत. निर्दयी आहेत. कधी काटा काढतील कळणार पण नाही. आता अजित पवारांना बाजूला करण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यात शिंदे गटाचे लोकही सामील आहेत. अजित पवार गेल्यानंतर जास्तीत जास्त जागा मिळतील, त्यामुळे गरज सरो वैद्य मरो, अशी भाजपची खेळी आहे. त्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्ये केली जात आहेत. पण यातअजित पवारांचा पहिला बळी आणि दुसरा बळी शिंदे गटाचा जाणार आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीचा अद्याप कोणताही अधिकृत सर्वे आलेला नाही,पक्षांचे सर्वे, चॅनेल्सचे सर्वे असं काहीही नाही, अजून निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत. हे सर्वे आणि त्यांसर्भात सुरू असलेल्या अफवांवर विश्वास् ठेवू नका, सत्ता बदल होत असतात, राज्यात परिवर्तनाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहेत. त्यामुळे अशी सर्वेच्या बातम्या येत असतात. पण राज्यात कोणत्या भागात काय निकाल लागतो, याबाबत आम्हाला खात्री आहे, असही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.
हेही वाचा:
राहाला मल्याळम अंगाई गाऊन झोपवतो रणबीर
‘मॅच सुरु असताना माझ्याकडे बघतच नाही’; पत्नीच्या तक्रारीवर रविचंद्रन अश्विनची फिरकी
फळ विक्रेत्याने प्लास्टिकच्या पिशवीत लघूशंका केली अन्…; धक्कादायक Video Viral