अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील…; आमदार बच्चू कडूंचे मोठे विधान
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (latest political news)सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. जस जशा निवडणुका जवळ येत आहेत, तशा राजकीय घडामोडींना वेग आला. अनेक नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अशातच आता प्रहारचे नेते तथा आमदार बच्चू कडू यांनी एक मोठे विधान केलं. अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडतील, असे राजकीय संकेत आहेत, असं विधान बच्चू कडू यांनी केलं.
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये(latest political news) बरीच फुट पडेल आणि त्यातून आमची महाशक्ती तयार होईल, असंही ते म्हणाले. बच्चू कडू यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. कडू म्हणाले, पंकजा मुंडे यांनी विधानसभा लढवण्यासाठी जागा नाही, असे विधान केले आहे. पंकजा मुंडे जे बोलल्या ते खरंचं आहे. विधानसभेत धनंजय मुंडे आहेत. मात्र अजित पवार महायुतीसोबत राहिले तर धनंजय मुंडे यांना महायुतीचे तिकीट मिळेल. अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास धनंजय मुंडे यांची जागा रिकामी होईल, असं ते म्हणाले.
यावरूनच अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडतील असे वाटते का? असा प्रश्न त्यांना विचारला असता, ते म्हणाले, एकंदरीत चित्र बघता, असं वाटतं की, अजित पवार हे बाहेर पडलील, असे राजकीय संकेत आहेत. पत्रकारांकडे जशी सूत्रे असतात, तशीच आमचेही आहेत. खरंतर आगामी विधानसभेपूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीत बरीच फूट पडणार आहे आणि त्यातूनच आमची महाशक्ती तयार होईल, असं कडू म्हणाले.
दरम्यान, अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तर तिसऱ्या आघाडीत सहभागी होतील का? यावर कडू म्हणाले की, अजित पवार आमच्यासोबत येतील की नाही, हे आता सांगता येणार नाी. याबाबत आमची सुकाणू समिती निर्णय घेईल, असे बच्चू कडू म्हणाले.
पुढे बोलताना बच्चू कडू यांनी आज मुंबईत झालेल्या दिव्यांग बांधवांच्या आंदोलनावरून सरकाररला इशारा दिला. दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अनेकदा भेटलो आहोत. त्यावेळी शासनाने दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्याचे आणि त्यांना मिळणारे मानधन वेळेत देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, ते आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. पाच टक्के निधी दिव्यांगांवर खर्च व्हायला हवा, मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे आज केवळ मुंबईतच आंदोलन झालं आहे. मात्र दिव्यांगांचे प्रश्न सुटले नाही तर राज्यभर आंदोलन करू, असा इशारा कडूंनी दिला.
हेही वाचा:
आज जुळून आला गुरु पुष्य योग; ‘या’ 5 राशींचं भाग्य उजळणार!
‘मूर्ख तू नाहीस, तर मी आहे,’ …अन् संतापलेल्या धोनीने घातल्या शिव्या
राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, ‘या’ जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर