अजित पवार महायुतीतून बाहेर पडून आमच्यात येतील; बड्या आमदारांचा दावा

अमरावती : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका(political news) होणार आहेत. त्यासाठी सर्व प्रमुख नेते आणि पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणूकीनंतर महायुतीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मात्र महायुतीमध्ये सारं काही अलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे.

जागावाटपावरुन आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये महायुतीमध्ये वाद निर्माण होत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत नाराजी असल्याचे देखील म्हटले जात आहे. त्यामुळे अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडतील अशी चर्चा रंगलेली असताना याबाबत आता विद्यमान आमदारांनी वक्तव्य केले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

राज्यामध्ये लोकसभा निवडणूकीचा(political news) निकाल महायुतीला अपेक्षित असा लागला नाही. त्यानंतर लगेचच अजित पवार यांच्या महायुतीमधील सहभागाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे महायुतीलाच अजित पवार नकोसे झाले आहेत का असा प्रश्न निर्माण झाला होता. त्याचबरोबर स्थानिक नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरु आहेत.

अजित पवार यांनी त्यांच्या विधानसभेच्या प्रचाराला जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून सुरुवात देखील केली आहे. यावेळी देखील योजनेमध्ये मुख्यमंत्री नावाचा उल्लेख टाळल्यामुळे चर्चांना जोर मिळाला. याबाबत आता महायुतीतून नुकतेच बाहेर पडलेले आणि परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी निर्माण करणारे प्रहार नेते बच्चू कडू यांनी मत व्यक्त केले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी राजकीय भविष्यवाणी केली आहे. बच्चू कडू यांनी सध्याच राजकीय स्थिती आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकांमध्ये होणारे परिणाम याबाबत वक्तव्य केले. बच्चू कडू म्हणाले, सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अशी अनेक चिन्ह दिसून येत आहे. त्यामुळे अजित पवार हे महायुतीमधून बाहेर येतील असं वाटत आहे. किंबहूना ते आता आमच्यामध्ये येतील आणि महाशक्ती तयार होईल. असे विधान बच्चू कडू यांनी केले आहे. त्यांची ही राजकीय भविष्यवाणी किती खरी ठरते याची आता काहीच दिवसात प्रचिती येईल.

पुढे बच्चू कडू म्हणाले की, “अजित पवार जर महायुतीतून बाहेर गेले तरच त्यांची जागा त्यांना मिळेल. अन्यथा त्यांना जागा मिळणार नाही. सगळ्या आघाडी आणि युतीमध्ये बरीच फाटाफूट होईल असं चित्र सध्या आहे. ते बाहेर पडतील आणि आमची महाशक्ती होईल. त्यांना आमच्या आघाडीत घ्यायचं की नाही हे आमची सुकाणू समिती ठरवेल. ते महायुतीमधून बाहेर पडतील असे काही संकेत आहेत. जशी तुमची सूत्र असतात तशी आमचेही सूत्र असतात,”असे सूचक विधान बच्चू कडू यांनी केले आहे.

माध्यमांनी बच्चू कडू यांना पंकजा मुंडे यांच्याबाबत प्रश्न केला. विधान परिषद आमदार पंकजा मुंडे यांनी आता महायुतीमध्ये विधानसभेसाठी मलाच जागा नाही, या आशयाचे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार कडू म्हणाले की, “पंकजा मुंडे यांचं खरंतर बरोबर आहे. बीडमधून विधानसभेसाठी आता धनंजय मुंडे आहेत,” असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

हेही वाचा:

खळबळजनक ! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं अन्…

ठरलं तर! ‘या’ दिवशी हिंदी बिग बॉस 18 प्रेक्षकांच्या भेटीला येणार

अजित पवारांची मोठी खेळी, काँग्रेस आमदार घड्याळ हातात घेणार?