लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज, योजनेसाठी अर्ज करण्यास मिळणार मुदतवाढ?
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचे पैसे अनेक महिलांच्या खात्यात (Good news)जमा झाले आहेत. या योजने अंतर्गत महिलांना जुलै महिन्यापासून दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जात आहेत. राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून महिलांसाठी ही योजना राबवली जात आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
लाडकी बहीण योजनेचा(Good news) लाभ घेण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत अर्ज करता येणार होते. आता राज्य सरकारकडून पुन्हा एकदा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिनाअखेरपर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
योजनेसाठी आतापर्यंत 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी 24 सप्टेंबरपर्यंतची आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. पाहायला गेलं तर सरकारकडून अद्याप याबाबत कोणतीच माहिती समोर आली नाहीये.
राज्य सरकारने जुलै महिन्यापासून ही योजना सुरू केली. या योजनेनुसार 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची पहिली अंतिम मुदत 31 ऑगस्टपर्यंत होती. त्यानंतर मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. आता आणखी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे महिलांना सरकारकडून देण्यात आले आहेत. लवकरच आता तिसरा हप्ता देखील दिला जाणार आहे. 29 सप्टेंबरपर्यंत महिलांना योजनेचा तिसरा हप्ता मिळणार आहे. तसेच, ज्यांना योजनेचे अद्याप एक रुपयाही मिळाला नाही, त्यांना थेट 4500 रुपये मिळतील.
हेही वाचा:
आर्याची मजेदार टिप्पणी: ‘त्याचे खायचे दात वेगळे…’ आणि निक्कीवर प्रेमळ चेष्टा!
“दिग्गज ग्रुप कंपनीची दिवाळखोरीची लकेर; शेअरचा भाव ₹43 वर पोहोचल्याने गुंतवणूकदारांवर संकट!”
आजीबाईंचा दिलखेचक प्रपोजल: गुडघ्यावर बसून आजोबांना ‘तू ये साजना’ म्हणत दिला रोमांचक प्रस्ताव!