बड्या बापांच्या मुलांनी अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक अत्याचार

शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपुर्वी शहरातील कोरेगाव पार्क येथील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चार मुलांनी अत्याचार(rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या प्रकरणी मंगळवारी (दि. 24) कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात या चारही आरोपींवर पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांना एक पत्र लिहलं आहे. यामुळे पुण्यामध्ये खळबळ उडाली आहे.

आमदार रविंद्र धंगेकर यांनी लिहलेल्या पत्रामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, पिडीत मुलगी ही एका प्राध्यापकाची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्राध्यापकाने यासंदर्भात तक्रार देखील महाविद्यालयाच्या ट्रस्टींकडे केली होती, परंतु ट्रस्टींनी हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकरांनी केला आहे.

मात्र या घटनेत बलात्कार(rape) करणाऱ्या मुलांपैकी काही मुले ही मोठ्या बापांची असल्याने एक मुलगा हा उप-जिल्हाधिकारी (प्रांत-अधिकारी) यांचा असल्याने संस्थेचे ट्रस्टींशी त्यांच्याशी काही गैरमार्गाचे आर्थिक हितसंबंध असल्याची माहिती धंगेकरांनी दिली आहे. त्यामुळे आरोपी मुलाला वाचविण्याकरीता पीडित मुलीच्या वडिलांवर दबाव आणत आहे अशी चर्चा महाविद्यालयांतील सेवक वर्गात सुरु आहे.

यासंदर्भात संस्थेचे ट्रस्टींशी आणि महाविद्यालयांचे अधिकारी यांची भूमिका अत्यंत संशयास्पद असल्याचं दिसून येत आहे असं काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. तसेच या सर्व प्रकारामुळे पिडित मुलीच्या पालकांवर देखील संस्थेने दबाव आणला का? तसेच बड्या बापाच्या मुलांना या प्रकरणात वाचवलं जात आहे का? या संदर्भात सखोल तपास व्हावा अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली जात आहे.

तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रकरणातील दोन मुलं हे अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे पुण्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा:

विधानसभेपूर्वी काँग्रेसचा मोठा निर्णय, 13 नेत्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

दसरा-दिवाळी ते नवरात्र, ऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस बँका बंद

अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर अंत्यसंस्काराची जबाबदारीही महायुती सरकारनेच उचलली