हवामान बदलामुळे जंगली टर्की पक्ष्यांची अद्भुत आगमन; इंदापूरमध्ये नवीन पाहुणे!

इंदापूर : हवामान (weather) बदलामुळे पक्षी स्थलांतर करत असतात. लाखो किलोमीटरचे अंतर पार करत पक्ष्यांचे हे स्थलांतर होत असते. पक्षीप्रेमींसाठी तर ही एक पर्वणीच असते. आता इंदापूरमध्ये देखील परदेशी पाहुणा पक्षी दाखल झाला आहे. मूळचा उत्तर अमेरिकेचा निवासी असलेला जंगली टर्की पक्षी इंदापूरमध्ये दिसून आला आहे. जंगली टर्की पक्षाची नर व मादी हे तरंगवाडी (ता. इंदापूर) परिसरात आढळून आले आहेत. कोंबडी सारखा दिसणारा मात्र आकाराने मोठा असणारा टर्की याअगोदर आढळून आल्याची कोठेही नोंद नाही, अशी माहिती पक्षी तज्ञांनी व वन अधिकाऱ्यांनी दिली.

मूळचा उत्तर अमेरिकेत आढळणारा जंगली टर्की हा मेलेग्रीस वंशातील एक मोठा पक्षी आहे. नर टर्की पक्षी मादीपेक्षा आकाराने मोठा असतो (weather). नर वन्य टर्कीचे पंख विविध रंगात असतात. तर मादीचे पंख तपकीरी असतात. नर आणि मादी टर्कीच्या मानेवर लाल रंगाची लटकलेली त्वचा असते. तो जमिनीवर ताशी 40 किलोमीटर वेगाने धावतो. ताशी 88 किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकतो. त्याच्या इतरही काही उपजाती आहेत.

काय म्हणतात पक्षी अभ्यासक?

या परदेशी पाहुण्यांबाबत इंदापूरमधील पक्षी अभ्यासक संदीप नगरे यांनी अधिकची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “जंगली टर्की हा विदेशी पक्षी आहे. वजनदार असल्यामुळे तो जास्त अंतर उडू शकत नाही. प्रवासात भटकून बरेचसे पक्षी आपल्या भागात येत असतात. परंतू, हा पक्षी यापूर्वी इंदापूर तालुका आणि परिसरात आढळून आल्याची नोंद नाही. तो उत्तर अमेरिका या देशात आढळून येतो. गेल्या वर्षभरात अंटार्टिका खंडात आढळणारा तैगाबीन बुज, रेड फेलारोप हे पक्षी आढळून आले होते. तर आर्टिक खंड भागात आढळणारा आर्टिक टर्न  हा पक्षी ९६ वर्षातून पहिल्यांदा आढळला होता. जगभरात सर्वात जास्त लांबचा प्रवास करणारा पक्षी म्हणून त्याची नोंद आहे. मोठमोठी वादळे, तसेच वातावरण (weather) बदलामुळे असे पक्षी भटकतात,” असे मत पक्षी अभ्यासक संदीप नगरे यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

भाजपच्या माजी खासदाराने राष्ट्रवादीच्या नेत्याला केली बेदम मारहाण!

शालेय विद्यार्थ्याना ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस सुट्टी

बड्या बापांच्या मुलांनी अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक अत्याचार