जात पंचायतीचा अजब कायदा! सासऱ्याने प्रेमविवाह केल्यामुळे सुनेला सुनावली शिक्षा

आष्टी : महाराष्ट्रातील अनेक समाजांमध्ये आजही जात पंचायतीचा वापर न्याय मिळवण्यासाठी केला जातो(marriage). या जात पंचायतींकडून दिल्या जाणाऱ्या बहिष्कार सारख्या गंभीर शिक्षेच्या प्रकारावर महाराष्ट्र सरकारने कायदा आणून वचक बसवण्याचा प्रयत्न केला आहे.

2016 साली या पद्धतीचे कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले होते मात्र अजूनही राज्यामध्ये एखाद्या कुटुंबाचा बहिष्कार करणे किंवा त्यांना वाळीत टाकण्याचा प्रकार सुरु असल्याचे दिसून आले आहे. आष्टीमध्ये असाच प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. सासऱ्याने प्रेमविवाह(marriage) केल्यामुळे त्याची शिक्षा सुनेला सुनावण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये हा धक्कादायक गुन्हा घडला आहे. फुलमाळी कुटुंबातील व्यक्तीने जात पंचायतीच्या परवानगी शिवाय प्रेमविवाह केला. नरसु फुलमाळी असे त्यांचे नाव असून सासऱ्याने विना परवाना प्रेमविवाह केल्याने जात पंचायतने अजब फतवा काढला.

मालन फुलमाळी नामक त्यांच्या सुनेला जात पंचायतने बहिष्काराची शिक्षा दिली. जातपंचायतीने मालन फुलमाळी यांच्या सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचे आदेश दिले. आष्टी तालुक्यातील डोईठाण या ठिकाणी 22 सप्टेंबर 2024 रोजी हा प्रकार घडला. ही घटना घडल्यानंतर हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तीरमाली समाजातील जात पंचायतीमध्ये हा धक्कादायक प्रकार आहे. जातपंचायतीने मालन फुलमाळी यांच्या सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचे आदेश दिले. हे प्रकरण समोर आल्यानंतर जात पंचायतीने सासरे नरसु फुलमाळी यांना अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

परंतु अनेक वर्ष उलटल्यानंतरही हा दंड भरला न गेल्याने जात पंचायतीने त्यांच्या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला आहे. महिलेच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक बहिष्कार अधिनियमानुसार आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

सनातन धर्म रक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना होणार? 

शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार, महायुतीचे खासदार हजेरी लावणार?

भूमिका देणार म्हणून झोपायला…; अभिनेत्रीच्या खुलाशाने खळबळ!