मगरीच्या तोंडात हात घालून स्टंट करत होता तरूण अन्…; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप

सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ आपण पाहतो. अनेकदा असे व्हिडिओ(video) आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा मनोरंजक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही स्टंट करणाऱ्यांचे देखील अनेक व्हिडिओ पाहिले असतील. अनेकदा लोक असे स्टंट करतात ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. असे व्हिडिओ बघितल्यावर एकच प्रश्न मनात असे धोकादायक स्टंट करण्यासाठी यांच्यात एवढा आत्मविश्वास येतो करी कुठून.

सध्या असाच एक धोकादायक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. खरेतर हा व्हिडिओ(video) एक तरूण त्याच्या कामाचा भाग म्हणून लोकांना स्टंट करून दाखवत होता. या व्यक्ती मगरीच्या तोंडात हात घालवून दाखवण्याचा स्टंट केला आहे. पण काही क्षणात असे काही झाले की, सगळ्यांचाच थरकाप उडाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देखील अनेकजण घाबरले आहेत. मगर खूप भयानक आणि हिंसक प्राणी आहे. कोणावर कधी हल्ला करेल सांगता येत नाही.

व्हायरल व्हि़डिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूण एक स्टेडियममध्ये मगरीसमोर उभा आहे. मगरीच्या आजूबाजूला पाणी आहे. तसेच तिला एका काचेच्या रूममध्ये ठेवण्यात आले आहे. तिथेच तो तरूण देखील स्टंट करत आहे. तेथे अनेक लोक जमले आहेत. त्याच्या स्टंट बघत आहेत. काहीजण याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढत आहेत. तो तरूण दोन वेळा मगरीला हात लावतो. मगर तोंड उघडून असते. तो तरूण तिच्या तोंडात हात घालतो आणि बाहेर काढतो. दुसऱ्यावेळी तो असे करायला जातो आणि मगर गचकन त्याच्या हाताला चावते. तरूमाच्या हातातून रक्त येऊ लागते. तो तिथून बाहेर जातो.

हे दृश्य पाहत असलेले लोक देखील घाबरतात. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @memes_with_you12 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. त्याचबरोबर अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘याला म्हणतात उडणारा बाण घेणे.’ दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, ‘तो वाचला हे भाग्यवान आहे अन्यथा मगरींनी त्याचा हात उखडून काढला असता. तर आणखी एकाने म्हटले आहे की, असे स्टंट लोकांना दाखवण्यासाठी का ठेवले जातात? असा प्रश्न त्याने विचारला आहे.

हेही वाचा :

‘…तर मी सरकारमधून बाहेर पडेन’; ‘या’ बड्या नेत्याची धमकी

‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं विधान; म्हणाले, ‘ही योजना कधीही…’

मोठी बातमी! रिलायन्स-डिज्ने यांच्यातील कराराला केंद्र सरकारची मंजुरी