अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी!

मुंबई : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या(cabinet) बैठकीत घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे..

आदिती तटकरे म्हणाल्या की, आज मंत्रिमंडळाच्या(cabinet)बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी त्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. मानधनात साधारण 50 टक्के वाढ आम्ही केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना 3 हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मिळत होते. त्यात आता 5 हजार अधिक मिळणार आहेत. मागच्या वेळेस 3 हजार वाढवले होते. मात्र, आता पाच हजार वाढवण्यात आले आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, अतिशय परखडपणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मानधनात वाढ करण्यात आल्याने आम्हाला आनंद होत आहे. तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील आम्ही सुरू करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमची अग्रेसर मागणी पूर्ण केली आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत आदिती तटकरे म्हणाल्या की, काल प्रशासनाच्या दृष्टीस ही बाब आली. मी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. जे 37, 38 अकाऊंट आहेत, ते सिल करण्यात यावे, जे फॉर्म भरण्यात आले ते देखील क्रॉस व्हेरिफाय करण्यात यावे, जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही असे आदेश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

आतापर्यंत 1 कोटी 87 लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होता आहेत. ज्यांचे फॉर्म काही कारणास्तव मागे राहिले होते, त्यांना तिन्ही महिन्यांचे पैसे आणि ज्यांना आधी 2 महिन्यांचे मिळाले त्यांना या महिन्याचे पैसे मिळतील, असे माहिती त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा :

‘या’ अभिनेत्याचे झाले फेसबुक अकॉउंट हॅक

विधानसभेआधी मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! 

सबसिडीच्या भरवशावर राहू नका, सरकार म्हणजे विषकन्या- नितीन गडकरी