ब्लॉकबस्टर ऑक्टोबर, वर्ल्ड कप खेळणार टीम इंडिया, पाकिस्तानसोबत होणार मुकाबला

भारतीय क्रिकेट(match) फॅन्ससाठी ऑक्टोबरच महिना हा ब्लॉकबस्टर राहणार आहे. या महिन्यात पुरुष आणि महिला संघाचे सामने रंगणार असून यात भारताची महिला क्रिकेट संघ आयसीसी टी 20 वर्ल्ड कप खेळणार आहे तर पुरुषांचा संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश विरुद्ध सीरिज खेळेल.

भारताचा पुरुष संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात जुलै महिन्यात आयसीसी मेन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकला होता. तर आता ऑक्टोबरमध्ये सुरु होणाऱ्या वूमन्स टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यावर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाची नजर असेल.

वूमन्स टी 20 वर्ल्ड कपच्या 8 सीजनमध्ये भारत आतापर्यंत केवळ एकदाच फायनल खेळला आहे. 2020 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. तर 2023 च्या सेमी फायनलमध्ये सुद्धा त्यांचा पराभव झाला होता.

3 ऑक्टोबर पासून आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार असून यात टीम इंडियाचा पहिला सामना(match) 4 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध होईल. हा मुकाबला दुबईत खेळवला जाणार असून त्यानंतर 6 तारखेला भारत – पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. या सामन्याची भारतीय फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत.

भारतीय महिला संघ हा ऑक्टोबरमध्ये फक्त वर्ल्ड कपचे सामने खेळेल. आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल 17 आणि 18 ऑक्टोबरला होणार असून वर्ल्ड कप फायनल 20 ऑक्टोबरला होईल.

भारतीय पुरुष संघाबद्दल बोलायचे झाल्यास ऑक्टोबरमध्ये ते बांगलादेश विरुद्ध दोन सामान्यांची टी 20 सीरिज खेळतील. 6 आणि 9 ऑक्टोबर रोजी हे सामने पार पडतील. तर रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळेल. यातील पहिला टेस्ट सामना हा 16 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल.

ऑक्टोबर महिन्यात भारतीय पुरुष संघाचं शेड्युल :

तारीखविरुद्धसामनाठिकाणवेळ
6 ऑक्टोबरबांगलादेशपहिला टी20ग्वालियर7:00 PM
9 ऑक्टोबरबांगलादेशदूसरा टी20दिल्ली7:00 PM
12 ऑक्टोबरबांगलादेशतीसरा टी20हैदराबाद7:00 PM
16-20 ऑक्टोबरन्यूझीलंडपहिली टेस्टबेंगलुरु9:30 AM
24-28 ऑक्टोबरन्यूझीलंडदूसरी टेस्टपुणे9:30 AM

ऑक्टोबर महिन्यात भारतीय महिला संघाचं शेड्युल :

तारीखविरुद्धसामनाठिकाणवेळ 
4 ऑक्टोबरन्यूझीलंडवर्ल्ड कपदुबई7:30 PM
6 ऑक्टोबरपाकिस्तानवर्ल्ड कपदुबई3:30 PM
9 ऑक्टोबरश्रीलंकावर्ल्ड कपदुबई7:30 PM
13 ऑक्टोबरऑस्ट्रेलियावर्ल्ड कपशारजाह7:30 PM

हेही वाचा :

थिएटरनंतर आता ज्युनियर एनटीआरचा ‘देवरा’ OTT वर रिलीज! 

कांद्यावरील निर्यातबंदी हटवल्यानंतरही दर मात्र ‘जैसे थे’; सर्वसामान्यांना दिलासा नाहीच !

लहानग्याने टीव्ही सुरु करण्याचा प्रयत्न केला अन् तोच अंगाशी आला; शॉक लागून क्षणात झाला मृत्यू