राज्य सरकार लाडक्या बहिणींना विकत घेणार का?; काँग्रेसच्या महिला खासदाराचा थेट सवाल
गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारने(government) महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेला राज्यभरातून जरी चांगला प्रतिसाद मिळत असाल तरी देखील विरोधी पक्षाने राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. अशातच आता या योजनेवरून काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारावर निशाणा साधला आहे.
राज्य सरकारने(government) राबलेल्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रतिमहिना 1 हजार 500 रूपये दिले जात आहेत. मात्र या योजनेवरून विरोधी पक्षाकडून वारंवार टीका केली जात आहे. कारण निवडणुकीआधी महिलांना लक्ष करण्यासाठी ही योजना आणल्याचं विरोधी पक्षनेते म्हणत आहेत. तसेच विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ही योजना बंद होईल अशी टीका देखील विरोधी पक्षांकडून केली जात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदे सरकार तुम्ही लाडक्या बहिणींना विकत घेणार का? असा थेट सवाल खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
याशिवाय गुजरातमधील कांद्याची निर्यात होत आहे. मात्र महाराष्ट्रातील कांद्याची निर्यात केली नाही. तसेच सिंचनाची पाणीपट्टी देखील तब्बल दहा टक्क्याने वाढवली आहे. याशिवाय भाजप नेते नितीन गडकरी काल म्हणाले की, अनुदान मिळणार नाही. कारण राज्य सरकारचे सगळे पैसे लाडक्या बहिणीसाठी वापरले आहेत. त्यामुळे आता कोणत्याही बहिणीला अनुदान मिळणार नाही.
येणाऱ्या दोन महिन्यात सर्व योजना देखील बंद होतील. मात्र केवळ तीन योजना चालू राहणार आहेत. आतापर्यंत निवडणुकीच्या काळात टेबलाच्या खालून पैसे देत होते. मात्र आतावरून पाच हजार रुपये देत आहेत. तसेच लाडक्या बहिणींना पैसे वाटून सरकार दिवाळखोर झालं आहे. कारण सगळे पैसे आता खर्च झालेत. त्यामुळे राज्य सरकार लाडक्या बहिणींना विकत घेणार का? पण आम्हाला पैसे नकोत तर आम्हाला सुरक्षा हवी आहे असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
किमान 3 दिवस रुग्णालयातच राहणार रजनीकांत
iPhone 16 वर रिलायन्सकडून बंपर ऑफर; मिळणार तब्बल ‘इतक्या’ हजारांचं डिस्काऊंट
‘त्याच्या’ गालाला गाल लावल्यानंतर शाहरुखने स्टेजवरच अभिनेत्रीच्या साडीचा पदर पकडून…