पतीशी भांडणानंतर पत्नीने केली 8 महिन्यांच्या मुलीची हत्या
महाराष्ट्रातील एका धक्कादायक घटनेत, पतीसोबत फोनवर झालेल्या भांडणानंतर संतापलेल्या आईने 8 महिन्यांच्या मुलीची हत्या (death)केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे.
घटना अशी आहे की, पत्नीचा तिच्या पतीसोबत फोनवर जोरदार वाद झाला होता. भांडणानंतर ती अत्यंत तणावात आणि रागात होती. त्या संतापाच्या भरात तिने स्वतःच्या 8 महिन्यांच्या निष्पाप मुलीचा जीव घेतला. घटनेनंतर तिने स्थानिक पोलिसांना बोलावून स्वतःच गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीसोबत झालेल्या वादामुळे ती खूप संतापलेली होती आणि तिचा राग इतका प्रचंड होता की तिने आपल्या मुलीला निर्दयीपणे ठार मारण्याचा निर्णय घेतला. अटक केल्यानंतर तिने सांगितले की, “माझ्या पतीसोबत रोजच वाद होत असतो. मला खूप तणाव आला होता आणि त्या क्षणी काय केले हे मला कळलेच नाही.”
या दुर्दैवी घटनेने कुटुंबिय आणि स्थानिकांमध्ये शोकाकुल वातावरण पसरले आहे. पोलिस तपास सुरु असून, पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रियेत आहे.
हेही वाचा :
500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी एल्विश यादव, भारती सिंहची होणार चौकशी
भाजपने उचलले मोठे पाऊल; आठजण निलंबित
‘या’ दिवशी येतोय ‘सिंघम अगेन’चा ट्रेलर!