‘या’ अभिनेत्याचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन, खलनायकाच्या भूमिकेसाठी होते लोकप्रिय!
ज्येष्ठ अभिनेते(actor) मोहन राज, हे त्यांच्या प्रत्येक भूमिकेसाठी खूप प्रसिद्ध आहेत. याचदरम्यान चाहत्यांसाठी आता दुःखाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्याचे ३ ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते. मोहन राज यांच्या निधनाने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. मल्याळम, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमधील कामासाठी ते ओळखले जात होते. शुक्रवार, ४ ऑक्टोबर रोजी केरळमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ते दीर्घकाळापासून पार्किन्सन्स आणि मधुमेहाने त्रस्त होते. तिरुअनंतपुरम येथून त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार सुरू होते. तीन दशकांच्या दीर्घ कारकिर्दीत मोहन राज यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र खलनायकाच्या भूमिकेतून त्यांना विशेष ओळख मिळाली. उप्पुकंदम ब्रदर्स, चैनकोल, आराम थंपुरन आणि नरसिंहममधील भूमिकांसाठी अभिनेता अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मोहन राज यांना त्यांच्या दमदार आवाज आणि अभिव्यक्तीमुळे दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका मिळायची आणि त्यात ते खूप यशस्वी झाले.
अभिनेते(actor) आणि दिग्दर्शक दिनेश पणीकर यांनी सोशल मीडियावर मोहन राज यांच्या निधनाची बातमी शेअर करत दुःख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, मोहन राज यांचे दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी निधन झाले आणि त्यांच्या पार्थिवावर दुसऱ्या दिवशी तिरुअनंतपुरम येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या घोषणेनंतर, सहकारी कलाकार, चित्रपट निर्माते आणि चाहत्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. अभिनेत्याचे चित्रपटसृष्टीतील योगदान सर्वांनाच आठवत आहे. साऊथ चित्रपटसृष्टी पूर्णपणे भावून झाली आहे.
मोहन राज यांचा जन्म केरळमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी अर्थशास्त्रातून पदवी प्राप्त केली, त्यानंतर वयाच्या 20 व्या वर्षी ते भारतीय सैन्यात दाखल झाले. मात्र, पायाला दुखापत झाल्याने त्यांना सैन्य सोडावे लागले. यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि ईडी (अंमलबजावणी संचालनालय) साठी काम करण्यास सुरुवात केली. 1988 मध्ये त्यांनी मल्याळम चित्रपट ‘मूनम मुरा’ मधून सिनेसृष्टीत पदार्पण केले. आणि या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम करून चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले.
हेही वाचा :
कन्यासह ‘या’ 5 राशींची चांदीच चांदी, होणार बक्कळ धनलाभ
‘धर्मवीर २’ ची नवरात्रीनिमित्त खास भेट; ४ ऑक्टोबरला बघा अवघ्या ९९ रुपयात
महिलांनो, लाडकी बहीण योजना लवकरच बंद होणार?; काँग्रेस नेत्यानं केलं मोठं विधान