अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार का? पंकजा मुंडे म्हणाल्या…

पुणे : अपेक्षेप्रमाणे जागावाटप झाले नाही, तर अजित पवार(Political news) महायुतीतून बाहेर पडतील, ही चर्चा केवळ माध्यमांमध्येच आहे. माझ्या ऐकिवात असे काही आलेले नाही, असे माजी मंत्री, आमदार पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असे म्हणणाऱ्यांनी त्यांचा या निर्णयाला विरोध आहे की त्यांना आनंद झालाय हे स्पष्ट करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

जागावाटप अजून निश्चित झालेले नाही. अजित पवार(Political news) यांच्याबाबतची चर्चा माध्यमांमध्येच होत आहे. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्येच राहायला हवे होते. मात्र, आता त्यांनी घेतलेला निर्णय त्यांचा वैयक्तिक आहे, असेही मुंडे म्हणाल्या. अमृताहूनही गोड अशा मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याचा मला प्रचंड आनंद आणि अभिमान आहे.

निवडणुका आहेत म्हणून चांगल्या निर्णयावर टीका करणे योग्य नाही. हे सर्व लोकहिताचे निर्णय आहेत. तुम्ही सत्तेवर होता, तेव्हा असे निर्णय का घेतले नाहीत, असा सवालही मुंडे यांनी केला. राज्यभर फिरून पक्षाचा प्रचार करता यावा, यासाठीच मी विधान परिषदेवर आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटना अत्यंत घृणास्पद आहेत. समाजातील विकृती वाढते आहे. कायद्याचा वचक असला पाहिजे. कडक कायदे असले पाहिजेत. परंतु, कायदा विकृतीला घाबरवू शकत नाही. संस्कार, प्रबोधनाच्या माध्यमातून महिलांना आदर देणारी, सन्मान करणारी भावी पिढी घडवली पाहिजे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

हेही वाचा :

दुःखद बातमी! ठाकरेंच्या झुंझार नेत्याचं निधन

शाळेमध्ये शिक्षकानेच…’ तिसरीतल्या विद्यार्थीने घरी रडत सांगितला ‘तो’ प्रसंग

शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ