सांगलीमधील बैठकीत संजयकाका पाटील अन् विशाल पाटील यांच्यात जोरदार राडा
सांगलीमधील(Political updates) तासगावमध्ये आयोजित बैठकीत माजी खासदार आणि विद्यमान खासदार एकमेकांमध्ये भिडल्याची माहिती समोर आलीयं. माजी खासदार संजयकाका पाटील आणि खासदार विशाल पाटील यांचा जाहीर सभेत जोरदार राडा झाला आहे.
सांगली बाह्यवळण मार्गाच्या प्रश्नावरुन तासगावमध्ये बैठक आयोजित(Political updates) करण्यात आली होती. या बैठकीमध्ये संजयकाका पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि विशाल पाटलांसह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घमासान झाल्याचं समोर आलंय.
सांगलीत नगरपालिकेच्या वास्तू उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडत होता. या कार्यक्रमाला भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील, विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. यावेळी भाषणात बोलताना विशाल पाटील यांनी संजयकाका पाटलांना डिवचल्यांच दिसून आलं.
विशाल पाटील म्हणाले, तालुक्याचा विकास होत आहे, मंत्री नितीन गडकरींचा कार्यक्रम सांगलीत पार पडला. त्यावेळी ते सांगत होते की, रोहित पाटलांना निरोप दे की रिंगरोडचं काम मंजूर केलेलं आहे. भाजपचे नेते असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकच्या नेत्याने मागणी केल्यानंतर एवढा मोठा निधी देत आहेत, हे पाहुन आनंद वाटतो विकासाच्या दृष्टीने गट-तट विसरुन एकत्र येऊन काम करतात, या शब्दांत विशाल पाटलांनी संजयकाका पाटलांना डिवचलं.
विशाल पाटलांच्या भाषणानंतर संजयकाका पाटलांनी बोलताना त्यांना प्रत्युत्तर दिलंय. संजयकाका म्हणाले, राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष, पार्ट्या असतात पण अशी वेळ येऊ देऊ नका की दुसऱ्याने केलेल्या कामावर आपण नाचावं आणि त्याचे बोर्ड लावणे. नितीन गडकरी आणि खासदाराचे संबंध संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहेत, असं प्रत्युत्तर संजयकाका पाटलांनी देताच विशाल पाटलांनी आम्ही भाषणात मान दिला असल्याचं जाहीर सभेत उभं राहून ठणकावून सांगितलं.
एवढचं नाही तर व्यासपीठावरुन पुढे येत विशाल पाटलांनी संजयकाका पाटलांशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही काळ विशाल पाटील आणि संजयकाका यांच्यात संभाषण सुरुच होते. मात्र, अचानक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत थेट व्यासपीठावर आले. यावेळी विशाल पाटील व्यासपीठावर ज्या ठिकाणी उभे होते त्या दिशेने कार्येकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले आहेत. बराच वेळ दोन्ही नेत्यांमध्ये गोंधळ सुरुच होता अखेर पोलिसांसह उपस्थित मान्यवरांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती निवळली.
हेही वाचा :
विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकाचीच केली धुलाई : Video Viral
दसऱ्यानंतर मुख्यमंत्री देणार आपल्या पदाचा राजीनामा? भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले…
रतन टाटा यांची प्रकृती खालावली, मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल