राज्यात आचारसंहिता कधी लागणार? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

आगामी विधानसभा(assembly) निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राज्यभर निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. अशातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र आता विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्याची सर्वजण वाट पाहत आहेत.अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

विधानसभा(assembly) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे/ त्यामुळे सभा, मोर्चेबांधणी दौरे, पक्षांतर, भेटीगीटी यासाठी उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.

पुढील दोन चार दिवसात आचारसंहितालागू होणार आहे. तसेच तुम्ही निवेदन दिल्यावर ती काम देखील मार्गी लागण अवघड आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुढील दोन चार दिवसात आचारसंहिता लागू होणार आहेत. त्यामुळे तुम्ही निवेदन दिल्यावर ती मार्गी लागणं देखील प्रचंड अवघड आहे. कारण बारामतीचे वातावरण चांगले ठेवण्यासाठी आपण सर्वजण 30 वर्ष प्रयत्न करत आहोत.

तसेच लोकसभेला जे काही झालं ते आपण सर्वजण विसरून जाऊ. आतापर्यंत सगळ्यात जास्त निधी मी हा आपल्या बारामतीला दिला आहे. त्यामुळे आजपर्यंत आपण सर्वजण घड्याळाचे बटन दाबत आलेलो आहोत मात्र लोकसभा निवडणुका वगळता. त्यामुळे आता विधानसभेला घड्याळाच्या चिन्हासमोरच बटन दाबून त्या उमेदवाराला विजयी करा असं आवाहन उपमुळ्यमंत्री अजित पवारांनी यावेळी केलं आहे.

हेही वाचा :

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली, सर्व दौरे रद्द

मुलाबरोबर गरबा खेळताना मृत्यू; धक्कादायक घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद; Video