बिश्नोई गँगची धमकी, सुरक्षेसाठी सलमान खानचा मोठा निर्णय
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला(actor) बिश्नोई टोळीकडून वारंवार धमक्या मिळत आहेत. काळवीट शिकार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई सलमानच्या मागे हात धूवून लागला आहे. बिश्नोई टोळीकडून सलमानला वारंवार धमक्या मिळत आहे, त्यातच काही महिन्यांपूर्वी त्याच्या घरावर गोळीबार देखील झाला.
यानंतर आता बाबा सिद्दीकीच्या हत्येचा संबंध बिश्नोई गँगशी जोडला जात असल्यामुळे सलमान खानच्या(actor) सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्याच्या घरी जाण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींशिवाय कुणालाही परवानगी नाही. शुटींगवेळीही तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे.
सलमान खानच्या जीवाला प्रचंड धोका असल्यामुळे पोलिसांसमोरही मोठं आव्हाण निर्माण झालं आहे. सलमान खान आता सुरक्षेच्या कारणासाठी आगामी शूटींग रद्द करणार असल्याची माहिती आहे. सलमान खानने काही दिवसांपूर्वी बिग बॉस 18 वीकेंड का वार एपिसोड शूट केला. यावेळी सलमानने म्हटलं की, कमिटमेंटमुळे मला शूटींगसाठी यावं लागलं, नाहीतर मला इथे यायचं नव्हतं. बिग बॉस वीकेंड का वारचं शूट 60 हून अधिक सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात करण्यात आलं होतं. यानंतर सलमान त्याच्या आगामी सिकंदर चित्रपटाचं शूटिंग करणार नाही.
सलमान खानचा आगामी चित्रपट सिकंदर 2025 च्या ईदला रिलीज होण्याची निर्मात्यांची योजना आहे. मात्र, सलमानच्या जीवाला असलेला धोका पाहता सलमान सध्या चित्रपटाचं शूटिंग करणार नसल्याची माहिती समोर आली आहे. सलमानने त्याच्या आगामी ‘सिकंदर’ चित्रपटाचे शूटिंगही पुढे ढकललं आहे.
रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटामध्ये सलमान खान चुलबुल पांडेच्या भूमिकेत कॅमिओ करण्याची चर्चा होती. पण, आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमानची सुरक्षा लक्षात घेता सिंघम अगेनमधील त्याचा कॅमिओ वगळण्यात आल्याची माहिती आहे.
सिकंदर चित्रपटाचं शुटींग या महिन्यात सुरु होणार होतं. त्यासाठी लोकेशन, आणि कलाकारांसह त्यांची राहण्या-खाण्याची व्यवस्था अशी शूटिंगची सर्व तयारी झाली होती. मात्र, आता हे शूटींग ठरलेल्या तारखेला होणार नाही. त्यामुळे याचा चित्रपट निर्मात्यांचं कोट्यवधींची नुकसान होण्याची शक्यता आहे. चित्रपट वेळेत पूर्ण झाला नाही, तर चित्रपटाची रिलीज डेटही पुढे ढकलली जाऊ शकते. असं झाल्यास निर्मात्यांना कोट्यवधींचा फटका बसू शकतो.
हेही वाचा :
मोठी बातमी! बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त
१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा व्हेजिटेबल उपमा
ब्रम्हांडात प्रथमच मंगळाचं 158 दिवस नीच स्थितीत भ्रमण; ‘या’ 3 राशींचं नशीब पालटणार