धक्कादायक ! माती खाल्ल्याने आवळला दोन वर्षांच्या बाळाचा गळा
नाशिक : आडगाव शिवारातील लेंडी नाला परिसरात असलेल्या घरासमोर खेळताना दोन वर्षांचा मुलगा माती(soil) खाताना आढळला. तेव्हा त्याने माती खाऊ नये म्हणून त्याला मारहाण केली. त्यामुळे तो रडू लागताच शांत करण्यासाठी त्याचा गळा दाबल्याने श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीसांनी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
विर बोके (वय 2) असे गळा दाबल्याने मृत्यू पावलेल्या बालकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या बुधवारी दुपारी आडगाव शिवारातील लेंडी नाला येथे घराबाहेर वीर व त्याचा अल्पवयीन मावस भाऊ असे दोघेजण खेळत असताना विर माती(soil) खात होता. त्यावेळी अल्पवयीन संशयित आरोपी असलेल्या मावस भावाने वीर याला बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी वीर खडीवर पडल्याने मार लागल्याने तो रडू लागला. त्याला शांत करण्यासाठी संशयिताने त्याचा गळा दाबला त्यात त्याचा मृत्यू झाला.
सदर घटनेनंतर आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अभिप्राय व संशयित अल्पवयीन बालकाची चौकशी केल्यानंतर त्याने घडलेल्या प्रकारची माहिती दिल्यानंतर आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मृत्यूस कारणीभूत ठरलेला बालक हा अल्पवयीन असून, त्याचे वय अवघे अकरा वर्षे आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याबाबत पोलीसांसमोरह प्रश्न आहे. या मुलास ताब्यात घेऊन त्याला बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा :
सूरज चव्हाणचा पहिलाच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात
एम एस धोनी IPL 2025 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने दिले मोठे अपडेट्स
भाजपला रामराम, 19 वर्षानंतर राणे पुन्हा शिवसेनेत