महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका पक्षाची एन्ट्री

ऐन विधानसभा निवडणुकीत राज्याच्या राजकारणात(political updates) आणखी एका पक्षाची स्थापना झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना केली आहे. आज झालेल्या शेतकरी मेळाव्यात त्यांनी याची घोषणा केली. राज्यास सध्या विधानसभा निवडणुखांची रणधुमाळी सुरू असून रविकात तुपर यांनी नव्या पक्षाची स्थापना करून निवडणुकीत उतरल्यामुळे आणखी चुरस वाढणार आहे.

राज्याच्या(political updates) विधानसभा निवडणुका गनिमी काव्याने लढवाव्या लागतीत, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे. दरम्यान ते कोणाला साथ देँणार की इतर स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जाणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

रविकांत तुपकर यांनी विधानसभा निवडणुक लढवण्याचा निर्धार केला आहे. बुलढाणा मतदारसंघाची मागणी त्यांनी केली असून तसा प्रस्ताव महाविकास आघाडीला दिला आहे. त्यावर सकारात्मक निर्णय नाही झाला तर पुढचा निर्णय घेऊ, असंही तुपकर यांनी म्हटलं आहे.

राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये आपला शेतकरी मतदार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये ज्या जागा निवडून येऊ शकतील त्याचा जागा लढवणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडे प्रस्ताव पाठवला आहे. पहिला प्रस्ताव महाविकास आघाडीला दिला आहे. त्यांच्याकडे काही सकारात्मक निर्णय झाला नाही तर दुसरा पर्याय वंचित बहुजन आघाडीचा आहे.

मात्र सन्मानाने सोबत घेत असतील तर ठीक नाहीत तर कोणाला पाडायचं व कोणाला निवडून आणायचं यावर लक्ष केंद्रित करु. , असे सूचक संकेतही रविकांत तुपकर यांनी दिले आहेत. मविआ आणि वंचित बहुजन आघाडी असे दोनच पर्याय आपल्याकडे आहेत. त्यानंतर मात्र आपला निर्णय स्वतंत्र राहिलं असं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

तळीरामांनो सावधान! आता ‘मदिरा’ पिऊन गाडी चालवाल तर…

पाच महिने रिचार्ज करण्याची गरज नाही; 400 रुपयांचा हा प्लॅन प्लॅन चालेल 150 दिवस

धक्कादायक ! माती खाल्ल्याने आवळला दोन वर्षांच्या बाळाचा गळा