निवडणुकीतच गेम करणार.., मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील(political articles) यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे यांना अज्ञाताकडून धमकी देण्यात आली आहे. एका युट्यूब चॅनलच्या कॉमेंटमध्ये अज्ञाताकडून ही धमकी देण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

एका युट्यूब चॅनेलच्या कॉमेंटमधून ही धमकी देण्यात आल्याने ऐन निवडणुकीत(political articles) मनोज जरांगे यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण केले जात आहेत. या कॉमेंटचा स्क्रिन शॉट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून येऊन गेम करणार’ अशा आशयाची धमकी ही कॉमेंटमध्ये लिहिण्यात आली आहे.

बजाज बिश्नोई लीडर नावाच्या फेक अकाऊंटवरुन ही धमकी देण्यात आली आहे. यानंतर मनोज जरांगे सध्या बसत असलेल्या सरपंच मळा येथील बैठकीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती आहे. जरांगे यांनी विधानसभेला मराठा उमेदवार देण्याची घोषणा केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची अनेक मंत्र्यांनी, नेते मंडळींनी भेट घेतली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चांगलाच गाजला. त्यामुळे उमेदवार आता पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांच्या भेटी-गाठी घेत आहेत. जरांगे यांनी सर्व जागा न लढवता जिथे ताकद आहे, तिथं अर्ज भरा असं आवाहन सर्व समर्थकांना केलं आहे.

“ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील त्या ठिकाणी उमेदवार द्यायचे. तसेच, ज्या ठिकाणी उमेदवार आपल्या विचाराचा असेल मग तो कोणत्या पक्षाचा असेल तरीही त्या उमेदवाराला आपण मदत करायची. तिथे आपण उमेदवार द्यायचा नाही. पण, त्या उमेदवाराकडून स्टॅम्प पेपरवर आपल्याला पाठिंबा देईल असं लिहून घ्यायचं.”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. अशात राज्यात विधानसभेची धामधूम असताना जरांगे यांना धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

इथं परफेक्शनीस्ट, तिथं साऊथ सुपरस्टार; ‘गजनी 2’ मध्ये कोण बाजी मारणार? 

सांगलीत सत्तेनं माजलेला नेता निर्माण झाला…; रोहित पटलांचा संजयकाकांवर कडक प्रहार 

‘दाना’ चक्रीवादळामुळे 56 टीम्स हाय अलर्टवर; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?