विधानसभेआधी राजकीय घडामोडींना वेग; ‘या’ माजी मंत्र्यांचा शरद पवार गटात प्रवेश
मोहोळ: विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय(Political) घडामोडींना वेग आला आहे. माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची भेट घेतली व त्यानंतर शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे भेट घेत शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
नुकतेच प्रा.ढोबळे यांची बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन भाजपचा (Political)राजीनामा देण्याची मागणी केली होती, कारण भाजपमध्ये मागील १० वर्षांपासून डावललं जात असल्याने भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी बहुजन रयत परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. त्यामुळं प्रा लक्ष्मण ढोबळे भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती.
त्यांना आज अधिकृतपणे प्रवेश मिळाला असून प्रा ढोबळे यांनी त्यांचे चिरंजीव युवक नेते ऍड अभिजीत ढोबळे यांच्या समवेत मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेऊन पक्ष प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड तसेच शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारामतीमध्ये काका-पुतणे अशी लढत होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीमधून ठाकरेंच्या शिवसेनेने या आता शरद पवार गटाने आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. तर पुण्यातून हडपसर मतदारसंघातून प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाकडून यादी जाहीर
१. जयंत पाटील -इस्लामपूर
२. अनिल देशमुख – कटोल
३. राजेश टोपे – घनसावंगी
४. बाळसाहेब पाटील – कराड उत्तर
५. जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा
६. शशिकांत शिंदे – कोरेगाव
७. जयप्रकाश दांडेगांवकर – बसमत
८. गुलाबराव देवकर – जळगाव ग्रामीण
९. हर्षवर्धन पाटील – इंदापूर
१०. प्राजक्त तनपुरे – राहुरी
११. अशोक पवार – शिरूर
१२. मसिंगराव नाईक – शिराळा
१३. सुनील भुसारा – विक्रमगड
१४. रोहित पवार – जामखेड कर्जत
१५. विनायकराव पाटील – अहमदपूर
१६. राजेंद्र शिंगणे – सिंदखेडराजा
१७. सुधाकर भालेराव – उदगीर
१८. चंद्रकांत दानवे – भोकरदन
१९. चरण वाघमारे – तुमसर
२०. प्रदीप नाईक – किनवट
२१. विजय भामरे – जितूर
२२. पृथ्वीराज साठे – केज
२३. संदीप नाईक – बेलापूर
२४. बापूसाहेब पठारे – वडगाव शेरी
२५. दिलीप खोडपे – जामनेर
२६. रोहिणी खडसे – मुक्ताईनगर
२७. सम्राट डोंगरदिवे – मूर्तीजापूर
२८. दिनेश्वर पेठे – नागपूर पूर्व
२९. रविकांत गोपचे – किरोडा
३०. भागयश्रि यात्राम – अहिरी
३१. बबलू चौधरी – बदनापूर
३२. सुभाष पवार – मुरबाड
३३. राखी जाधव – घाटकोपर पूर्व
३४. देवदत्त निकम – आंबेगाव
३५. युगेंद्र पवार – बारामती
३६. संदीप वरपे – कोपरगाव
३७. प्रताप धाकणे – शेवगाव
३८. राणी लंके – पारनेर
३९. मेहबूब शेख – आष्टी
४०. नारायण पाटील – करमाळा
४१. महेश कोठे – सोलापूर शहर उत्तर
४२. प्रशांत यादव – चिपळूण
४३. समरजीत घाटगे – कागल
४४. रोहित पाटील – तासगाव – कवठेमहाकाळ
४५. प्रशांत जगताप – हडपसर
हेही वाचा :
सर्वसामान्यांना बसताहेत महागाईच्या झळा; लसणासाठी पाचशेंची नोट खर्ची
विराट आणि न्यूझीलंडच्या खेळाडूमध्ये झालं भांडण? ड्रेसिंग रूममध्ये जाताना आपसात भिडले
मलायका अरोराच्या वाढदिवसाला अर्जुन कपूरची क्रिप्टिक पोस्ट