शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न चिघळवला, ‘या’ नेत्याचं टीकास्त्र

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मराठा आरक्षणाचा(political isuee) प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मोठा आरोप केला आहे. शरद पवारांच्या हातात प्रदीर्घ काळ केंद्र व राज्याची सत्ता होती. मात्र त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यावेळी का निकाली काढला नाही, उलट त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळवला असल्याचा आरोप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, आज शेंद्रे तालुका सातारा येथे सातारा मतदारसंघाचा(political isuee) महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवेंद्रसिंहराजे यांनी शरद पवारांवर आरोप केला आहे. शरद पवारांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, ॲड. दत्ता बनकर, विक्रम पवार, सुनील काटकर आदी दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होते.

याशिवाय शरद पाठीवर यांनी अल्पउत्पन्न गटातील मराठा समाजाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा आरोप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे. यामुळे आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अनेक वर्षे राजकारणात आहेत. मात्र, त्यांनी मराठा समाजाला राजकारणासाठी कायमच दुय्यम लेखले आहे. त्यामुळे गावागावांत राहणाऱ्या मराठा आणि ओबीसी समाजामध्ये व जाती-जातींमध्ये त्यांनी वाद देखील निर्माण केले आहेत. त्यामुळे पिढ्यान् पिढ्या मराठा आणि ओबीसी समाज गावागावांमध्ये व वाडी-वस्तीवर एकत्र आणि गुण्यागोविंदाने अजूनही राहत होते.

मात्र, शरद पवारांच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्यांमध्ये संशयाचे वातावरण सध्या निर्माण झाले आहे. त्यामुळे आता गावातील एकोपा देखील बिघडला आहे. त्यामुळे त्यांनी सर्व समाजांना आणि महाराष्ट्राला विकासापासून दूर ठेवल्याची टीका देखील शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे.

हेही वाचा :

6 वर्षानंतर दया पुन्हा दिसणार; ‘CID’चा दमदार कमबॅक, शो लवकरच चाहत्यांच्या भेटीला

दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार डबल फायदा!

ठाकरे, शिंदे की फडणवीस? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा