मोहम्मद शामीच्या करिअरवर पूर्णविराम? बीसीसीआयने घेतला निर्णय

बीसीसीआयने २५ ऑक्टोबर रोजी भारताच्या संघाची घोषणा केली आहे, यामध्ये भारताचा संघ(team india) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे तर एक संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी लढणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या T२० मालिकेसाठी भारताचा संघाने युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, यामध्ये टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. तर भारताचा संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४ कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळेल.

नोव्हेंबरच्या अखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी १८ सदस्यीय भारतीय संघाची(team india) निवड करण्यात आली आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाजी मोहम्मद शमी २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे बऱ्याच महिन्यांपासून संघापासून दूर आहे. बऱ्याचदा मोहम्मद शामी सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या दुखापतीबद्दल सोशल मीडियावर अपडेट असतो.

मोहम्मद शामी बऱ्याच दिवसांपासून संघामध्ये पुनरागमन करण्यासाठी सराव करत आहेत. परंतु अजुनपर्यत त्याला संघामध्ये स्थान देण्यात आले नाही. बीसीसीआयने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी संघ जाहीर केला यामध्ये १८ खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले. परंतु त्यामध्ये मोहम्मद शामीचे नाव कुठेही दिसले नाही. त्याचबरोबर संघामध्ये 3 खेळाडू राखीव आहेत ते सुद्धा प्रवास करणार आहेत.

मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. अशा स्थितीत मंडळाच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शामीचे नाव बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये नाही त्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली आहे. त्यामुळे आता असे म्हंटले जात आहे की, शामीचे करिअर आता संपुष्टात आले आहे का, असे प्रश्नही सोशल मीडियावर उपस्थित केले जाऊ लागले आहेत. बीसीसीआयने जाहीर केलेल्या माहितीमुळे हे प्रश्न उपस्थित होत आहेत.

बोर्डाने आपल्या प्रकाशनात म्हटले आहे की त्यांनी मयंक यादव, शिवम दुबे, रायन पराग आणि कुलदीप यादव यांच्या दुखापतींची माहिती दिली आहे, परंतु शमीला स्थान का मिळाले नाही याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. दुसरीकडे, शामीने नुकतेच एका इव्हेंटमध्ये सांगितले होते की, त्याला आता वेदना होत नाहीत.

नुकताच शमीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरला गोलंदाजी करत होता. शमीने सांगितले की, आधी तो अर्ध्या रनअपने गोलंदाजी करत होता, पण आता त्याने पूर्ण धाव घेऊन गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारीही शमीने गोलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये तो जबरदस्त लयीत दिसत होता.

हेही वाचा :

अ‍ॅक्शन, ड्रामा अन् रोमान्स.. रानटीचा जबरदस्त टीझर लाँच!

शेतकरी पुन्हा उतरणार रस्त्यावर! ‘हे’ महामार्ग अनिश्चित काळासाठी बंद

गरोदर प्रेयसीला ठार करुन गाडलं; पोलिसांनी कारण विचारलं तर म्हणतो, ‘ती फार…’