2025 मध्ये शनीची बदलणार चाल; ‘या’ राशींची होणार दिवाळी
ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला कर्मफळदाता आणि न्यायदेवता म्हणतात. शनीचं राशी(astrology) परिवर्तन हे अनेक राशींसाठी फार महत्त्वाचं मानलं जातं. याचं कारण म्हणजे. शनी जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्याचा काळ अडीच वर्षांचा असतो.
त्यामुळे शनीची साडेसाती असो वा ढैय्याचा परिणाम दीर्घ काळ चालणारा असतो. यामुळे काही राशींना(astrology) याचा फायदा होतो तर काही राशींना नुकसान सहन करावं लागतं. त्यामुळे याचा कोणत्या राशींवर परिणाम होतो ते जाणून घेऊयात.
शनी 2025 मध्ये राशी परिवर्तन करणार आहेत. 29 मार्च 2025 रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींना शनीची ढैय्या आणि साडेसातीपासून मुक्ती मिळेल तर काही राशींची साडेसाती सुरु होईल.
शनीच्या मीन राशीत प्रवेश केल्याने मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीची सुरुवात होईल. शनी संक्रमणाने कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीची तिसरी पायरी, मीन राशीच्या लोकांवर दुसरी पायरी आणि मेष राशीच्या लोकांवर पहिली पायरी सुरु होईल. त्याचबरोबर शनीच्या संक्रमणाने सिंह आणि धनु राशीच्या लोकांवर शनी ढैय्याची सुरुवात होईल.
शनीने मीन राशीत प्रवेश करताच मकर राशीपासून शनीची साडेसाती दूर होईल. शनीने राशी परिवर्तन केल्याने कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना शनीच्या ढैय्या आणि साडेसातीपासून मुक्ती मिळेल. त्यामुळे मकर राशीच्या लोकांवर गेले अडीच वर्ष शीची जी साडेसाती होती ती दूर होईल आणि या राशीचे लोक आनंदाने आयुष्य जगतील.
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे. शनीला एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो. तर, एका ग्रहातून दुसऱ्या ग्रहात राशी परिवर्तन करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे शनीच्या संक्रमणाने सर्व राशींचे लोक चिंतेत असतात.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
जुनी कार देईल दमदार मायलेज, फक्त इंजिनची अशी घ्या योग्य काळजी
सूरजच्या घराचे भूमीपूजन; अजित पवारांचे आभार मानत म्हणाला, ‘दादांचे मनापासून आभार…’
आमिर खानच्या सात किसिंग सीनचा किस्सा; अभिनेत्री म्हणाली, ‘माझी तर लॉटरीच लागली…’