राजकीय भूकंप घडवणारं Whatsapp स्टेटस! थेट तारीख, वेळ सांगत CM शिंदे- राज ठाकरेंना धक्का

माहीम विधानसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय(political) घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षीय उमेदवार सदा सरवणकर यांना मनसे उमेदवार अमित ठाकरे याला पाठिंबा देण्यास सांगत 24 तासांचा अल्टीमेटम दिला होता. मात्र, सरवणकर यांनी मुख्यमंत्री आणि महायुतीच्या सूचनांना धुडकावून आपला उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर सांगितलं की, “आमदार सदा सरवणकर यांचा उमेदवारी अर्ज 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता दाखल केला जाईल.” यामुळे माहीममध्ये तिघांची तगडी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे – एकीकडे अमित ठाकरे, दुसरीकडे सदा सरवणकर आणि तिसरीकडे शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत.

शिंदे-ठाकरे संबंधांवर परिणाम होणार?

मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मनसेने लोकसभा निवडणुकीला(political) महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता, आणि एकनाथ शिंदेंनीही काही ठिकाणी मनसेला उमेदवारीसाठी सहकार्य करण्याचं सुचवलं होतं. मात्र, सरवणकर यांनी पक्षाच्या निर्देशांचं पालन करण्याऐवजी आपला उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महायुतीत तणाव आणि राजकीय समीकरणं

शिंदे गटाकडून सरवणकरांना अर्ज मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, सरवणकरांनी आपल्या समर्थकांसोबत अर्ज दाखल करण्याचा निर्धार केला आहे. 29 ऑक्टोबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून त्यानंतर या मतदारसंघात लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.

आता, मुख्यमंत्री शिंदे सरवणकरांवर कारवाई करणार की तडजोडीचा पर्याय स्वीकारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. माहीम मतदारसंघातील या घडामोडींवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून अमित ठाकरे यांच्या राजकीय पदार्पणालाही मोठं वळण मिळणार आहे.

हेही वाचा :

2025 मध्ये शनीची बदलणार चाल; ‘या’ राशींची होणार दिवाळी

आमिर खानच्या सात किसिंग सीनचा किस्सा; अभिनेत्री म्हणाली, ‘माझी तर लॉटरीच लागली…’

तोंडात टाकताच विरघळणारी, भरपूर पदरांची खुसखुशीत शंकरपाळी कशी तयार करायची?