“हा एक कठीण काळ…”, सई ताम्हणकरचं अनिश जोगसोबत ब्रेकअप

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. तिने अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठीसोबतच हिंदीतही तिच्या अभिनयाने अनेक प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. त्यामुळे तिच्या खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांचं लक्ष असतं. सई ताम्हणकर तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. सईच्या ब्रेकअपची(break up) वर्षभर चर्चा होती. फक्त सईने यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता तिने तिच्या आणि तिच्या दौलतरावसोबतच्या नात्यावर मौन सोडलं आहे. यावेळी तिने आपला ब्रेकअप झाला असल्याचे तिने स्पष्ट केलंय आहे.

सई गेली काही वर्षे निर्माता अनिश जोग याला डेट करत होती. तिने त्याच्यासोबतचे अनेक फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले होते. ती त्याचा उल्लेख अनेकदा दौलतराव म्हणूनही करायची. मात्र आता त्याचं नातं संपलं असल्याचं तिने सांगितलं आहे. ‘मानवत मर्डर्स’ या वेब सीरिजनिमित्ताने हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलताना सईने तिच्या ब्रेकअपला(break up) दुजोरा दिला आहे.

याबाबत बोलताना सई म्हणाली, ‘ हा निर्णय परस्पर संमतीने घेण्यात आला, मात्र हा एक कठीण काळ होता. माझ्या मनात त्याच्याबद्दल कायम आदर राहील. तो माझ्या आयुष्यातली एक महत्त्वाची व्यक्ती राहील. या ब्रेकअपबद्दल आमच्या दोघांच्याही भावना सारख्याच आहेत.त्याच्या पुढील आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा… ‘

तसेच काही दिवसांपूर्वी सई ताम्हणकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं म्हटले होतं की, ‘I’m single by choice. Not my choice. But it’s still a choice’ याशिवाय, अनिश जोगसोबतचे सर्व फोटो सोशल मीडिया अकाउंटवरून डिलीट केले आहेत. तर साई ताम्हणकरनं नुकतीच ‘एचटी’ ला मुलखत दिली होती.

या मुलाखतीत सईनं तिच्या ब्रेकअपच्या चर्चांवर शिक्कामोर्तब करत खुलासा केला की “हो, आम्ही विभक्त झालो आहोत आणि हा निर्णय आम्ही दोघांनी ठरवून घेतला आहे. हा निर्णय घेणं कठीण होतं पण ते झालं आणि आहे ते आहे. तो माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची असलेली व्यक्ती आहे आणि कायम राहणार. त्यालाही असचं वाटतं हे मला माहित आहे.”

दरम्यान, ते दोघं आधी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसायचे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे नाही तर नेटकऱ्यांच्या पसंतीस देखील उतरायचे. दुसरीकडे अनिशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सईनं त्याच्यासोबतचे सगळे फोटो आणि व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डिलीट केले आहेत.

हेही वाचा :

दिवाळीच्या मुहूर्तावर 7 सीटर कारची सुपरहीट लॉन्च: किंमत फक्त 6 लाख!

वयाच्या २६व्या वर्षी ७४ कोटींची मालकीण: ‘ही’ अभिनेत्री आलिशान बंगला आणि लक्झरी कारची मालकीण!

ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाने भाजपच्या शहर प्रमुखाच्या श्रीमुखात भडकावली…