आनंदाचा…उत्साहाचा अन् मांगल्याचा सण दीपावली; प्रत्येक दिवसाचे महत्त्व तरी काय?
हिंदू संस्कृतीमध्ये सण, परंपरा आणि अनेक समृद्ध रितीरिवाज आहेत. त्यातील सर्वांत मोठा सण(festival) म्हणजे दिवाळी. आनंदाचा..उत्साहाचा आणि मांगल्याचा सण म्हणजे दीपावली. दिव्यांच्या झगमगासाठी हा सण ओळखला जातो. दीपावली या शब्दाचा अर्थ देखील दिव्यांची माळ असा होतो.
या दिव्यांच्या प्रकाशातून ज्याप्रमाणे सारा परिसर उजळून निघतो त्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील देखील षडरिपू, दुःख व अज्ञानरुपी अंधार ज्ञानाच्या व सुखाच्या प्रकाशाने नाहीसा व्हावा आणि सुख समृद्धी लाभावी या अर्थाने दिवाळी(festival) साजरी केली जाते.
अहंकारी लंकापती रावणाचा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांनी पराभव केला आणि धर्माचा विजय झाला. प्रभू राम लंकेहून अयोध्येमध्ये परत आले. त्यांच्या हा विजय वाईट प्रवृत्तीवर धर्माचा, सत्याचा विजय असे मानले जाते. या विजयाचे प्रतिक म्हणून दिवाळी साजरी केली जाते. कार्तिक महिन्यामध्ये साजरी केली जाणारी ही पाच दिवस साजरी केली जाते. या प्रत्येक दिवसाचे विशिष्ट असे महत्त्व आहे.
दिवाळीचा पहिला दिवा अर्थात पहिला दिवस वसुबारस असतो. आश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी येणाऱ्या या दिवसाला गोवत्सद्वादशीस असे देखील संबोधले जाते. हा दिवस एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपली भारतीय संस्कृती कृषीप्रधान आहे. यामुळे प्रत्येकाच्या दारी सुखसमृद्धीची साक्ष देत उभ्या असणाऱ्या गायवासराला या दिवशी पुजले जाते. दरवर्षी प्रेमाने आपले दुध शेतकऱ्यांना देऊन त्यांचे घर नंदनवन करणाऱ्या गायवासरासाठी या दिवशी पुरणपोळीचा घाट घातला जातो. त्यांची पूजा करुन बळराजा त्यांचे पाद्यपूजन करुन आणि नैवेद्य चारुन त्यांना एकप्रकारे धन्यवाद देत असतो. वसुबारस सणामुळे आपल्या संस्कृतीमध्ये असणारे गाय वासराचे महत्त्व अधोरेखित होते.
आरोग्य धनसंपदा
दिवाळीतील दुसरा दिवा म्हणजे आश्विन कृष्ण त्रयोदशीला साजरा केला जाणारा धनतेरस. हा दिवस खास करुन धन्वंतरी देवाला समर्पित केला जातो. धन्वंतरी वैद्यकीय क्षेत्रातील देव समजले जातात. या दिवशी डॉक्टरी क्षेत्रातील लोक धन्वतंरी देवाची मनोभावे पुजा करताता. दिवाळीतील हा दुसरा धनतेरस दिवस देखील आपल्याला मोलाची शिकवण देतो. ती म्हणजे प्रत्येकासाठी खरे धन हे आरोग्य आहे. आरोग्याची काळजी घेणे हे आपले परम कर्तव्य असल्याचे देखील धनतेरस मधून या दिवसामधून सांगितले जाते. हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो.
नरक चतुर्दशी
दिवाळीतील(festival) तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. कार्तिक महिन्यांच्या कृष्णा पक्षातील चतुर्दशीला हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी अभ्यंग स्नानाला अधिक महत्त्व आहे. पहाटेच्या प्रहरी लवकर उठून सुगंधी तेलाने व उटणं लावून प्रसन्न अभ्यंग स्नान करणाऱ्या व्यक्तीला स्वर्ग लाभतो अशी आपल्याकडे श्रद्धा आहे. या दिवशी सूर्योदयानंतर झोपेतून उठल्यावर नरकामध्ये जावे लागते अशी समज आहे. यामागे एक आख्यायिका आहे. श्रीमद्भागवतपुराणानुसा नरकासुर हा दुष्ट देवांचा व स्त्रीयांचा छळ करु लागला. त्यांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. हे श्रीकृष्णाला समजताच त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे या दिवशी अभ्यंग स्नानाला अधिक महत्त्व आहे…
घरातील लक्ष्मीचा सन्मान लक्ष्मीपूजन
दिवाळीतील चौथा आणि सर्वांत महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. अश्विन अमावस्येच्या दिवशी सारी सृष्टी ही दिव्यांच्या प्रकाशामध्ये प्रज्ज्वलित होते. वर्षातील अनेक महत्त्वाच्या पौर्णिमा व अमावस्येमधील लक्ष्मीपूजन या अमावस्येला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी दिव्यांची आरास केली जाते. हे दिवे परिसरासह आयुष्य देखील प्रकाशमान करतात. या मधून आपाल्याला वेगळीच उर्जा आणि शक्ती लाभते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी माता आणि धनाचे प्रतिक असणाऱ्या कुबेराची पुजा अर्चना केली जाते. घरातील सर्व सोने चांदी आणि पैशाची पुजा केली जाते. घरातील धनधान्य वृद्धींगत होत जावो अशी मनोकामना देखील केली जाते. यादिवशी व्यापारी वर्गाचे नवीन वर्षे सुरु होते. लक्ष्मीपूजन हा सण लक्ष्मी देवीला समर्पित केलेला आहे. या दिवशीच समुद्र मंथनातून लक्ष्मी देवी प्रकट झाली आणि भगवान विष्णू सोबत त्यांचा विवाह झाला. यामुळे देखील लक्ष्मीपूजन साजरे केले जाते. यादिवशी माता लक्ष्मी सर्वत्र भ्रमण करुन तिच्या मनोभावना आराधना करणाऱ्या भक्ताला कृपाप्रसाद देते असे मानले जाते. दिवाळीच्या या दिवशी सर्वत्र आनंददायी आणि प्रसन्न वातावरण निर्माण होते. फटाक्यांची आतीषबाजीने सारे विश्व दमदुमून जाते. सुखाची नांदी होते आणि आनंदाची छाया पसरते.
पवित्र नात्याला समर्पित – बलिप्रतिपदा
दिवाळी हा सणातील पुढचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. सणांच्या निमित्ताने कुटुंब एकत्र येतात. मने जुळतात. नात्यांमधील प्रेम वाढते. पाडवा हा दिवस पती पत्नीच्या पवित्र नात्यातील प्रेमाला, समर्पणाला अर्पित केलेला आहे.. हा दिवस लक्ष्मीनारायणाचा जोडा असे संबोधण्यात येणाऱ्या प्रत्येक नवरा बायकोसाठी आनंदाचा क्षण असतो. पत्नी नवऱ्याचे औक्षण करते तर पती तिला ओवाळणी देतो. बलिप्रतिपदा या दिवशी बळराजाच्या अर्थात शेतकऱ्याच्या घरी पूजन केले जाते. ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ अशा घोषणा दिल्या जातात. पाडवा हा एकत्र पवित्र दिवस असून साडे तीन मुहूर्तापैकी एक आहे.
भावा बहिणींचा प्रेमाचा भाऊबिज
या सणामध्ये(festival) प्रत्येक नात्याचे जतन व पूजन केले जाते. यामध्ये बंधु भगिनीच्या पवित्र नात्याला समर्पित असा भाऊबिज दिवस आहे. कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी अभ्यंग स्नान करुन बहिण पाटावर रांगोळी काढते आणि भावाचे औक्षण करते. भाऊ देखील बहिणीला प्रेमाने भेट देतो. बहिण भावाचे नाते हे नेहमी अनोखे आणि निखळ प्रेमाने ओथंबलेले राहिले आहे. दिवाळीमध्ये या नात्याचे देखील पूजन होते. प्रत्येक घरामध्ये आनंदाची बहार घेऊन येणारा दिवाळी सण हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा सण आहे. यानिमित्ताने नातलग एकत्र येतात आणि हा आनंद व्द्यगुणित करतात. प्रसन्नता आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या या पाच दिवसांचे वेगवेगळे महत्त्व आहे. प्रत्येक भागामध्ये तेथील संस्कृतीप्रमाणे दिवाळी साजरी केली जाते.
हेही वाचा :
लाडकी बहीण योजना बंद…’या’ नेत्यानी केला मोठा दावा?
नरक चतुर्दशीला करा ‘हे’ काम, जीवनात सुख-समृद्धीसह येईल भरभराट!
मनसेला निवडणूक आयोगाकडून सर्वात मोठा धक्का!