यंदा तब्बल २८ लाख दिव्यांनी उजळणार ‘प्रभू श्रीरामां’ची अयोध्यानगरी
अयोध्या: तब्बल ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्यानगरीत श्रीरामाचे(ram janmabhoomi) भव्य मंदिर उभे राहिले आहे. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून अयोध्येत होणाऱ्या दिवापलीची चर्चा संपरून जगभरात होत आहे. मात्र यंदाची दिवाळी समस्त देशवासीयांसाठी खास असणार आहे. ५०० वर्षांनी मंदिर उभे राहिल्यानंतर ही पहिलीच दिवाळी असणार आहे. तब्बल २८ लाख दिव्यांनी अयोध्यानागरी उजळणार आहे. उत्तर प्रदेश सरकारतर्फे अयोध्येत भव्य दिवाळीचे आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील करण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेश सरकार यावर्षी अयोध्यानगरीत शरयूतीरी असेच अनोखे आणि भव्य आयोजन करणार आहे. शरयूनदीच्या किनारी ५५ घाटावर तब्बल २८ लाख दिवे लावले जाणार आहेत. हा एक प्रकारचा वर्ल्ड रेकॉर्डच होण्याची शक्यता आहे. अयोध्या येथील राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान जल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी असल्याचे या दिवाळीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
तब्बल ५०० वर्षांनी होणाऱ्या राम(ram janmabhoomi) दिवाळीसाठी अयोध्यावासी सज्ज झाले आहेत. मोठ्या उत्साहात, आनंदात या ठिकाणी दिवाळी साजरी केली जाणार आहे. या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे पुष्पक विमानातून आगमन देखील सकरण्यात येणार आहे. अयोध्यानगरीतील रस्त्यांवर सजावट करण्यात आली आहे. मुख्य मंदिराला देखील आकर्षक रोषणाई आणि सजावट करण्यात आली आहे. दरम्यान अयोध्यानगरीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात आली आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी योग्य हाबरदरी घेतली जात आहे.
अयोध्या नगरीत सर्वत्र एकच आनंद पाहायला मिळत आहे. रामजन्मभूमीच्या ७० एकर परिसरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. आता २८ लाख दिवे लावण्यात येणार म्हणजे त्यासाठी मोठ्या प्रमाणात तेलाची देखील आवश्यकता लागणारच. यंदा २८ लाख दिव्यांसाठी जवळपास ९१ हजार लीटर तेलाचा वापर करण्यात येणार असल्याचे समजते आहे. अयोध्या नगरीत होत असलेल्या या दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी आणि याचा अनुभव घेण्यासाठी हजारो रामभक्त अयोध्येत दाखल होत आहेत. मिडिया रिपोर्टनुसार आयोध्येमधील ८० टक्के हॉटेल्सचे आरक्षण झाल्याचे समजते आहे. यंदा अयोध्यानगरीत प्रदूषणविरहित फटाके वाजवले जाणार आहेत.
जानेवारी २०२४ या महिन्यात समस्त देशवासीयांचे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले. तब्बल ५०० वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आणि रामलल्ला आपल्या भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोध्यत भव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. तसेच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. याची देही याची डोळा असा हा प्रसंग सर्वांनी आपापल्या हृदयात आणि डोळ्यांत साठवून घेतला. हे मंदिर व्हावे यासाठी अनेक कारसेवकांनी संघर्ष केला आहे. आपले प्राण अपर्ण केले आहेत. त्यामुळे हे मंदिर उभे राहिल्यानंतर यंदा होणारी दिवाळी ही सर्वांसाठीच अत्यंत खास अशी असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा :
LPG सिलिंडरपासून ते क्रेडिट कार्डपर्यंत…, 1 नोव्हेंबर पासून बदलणार अनेक नियम
आनंदाचा…उत्साहाचा अन् मांगल्याचा सण दीपावली; प्रत्येक दिवसाचे महत्त्व तरी काय?
सकाळी गरम पाणी पिण्याने वजन कमी होतो का? जाणून घ्या सत्य आणि तथ्य