अजितदादा- फडणवीसांना धक्का! सीएमपदासाठी जनतेची एकनाथ शिदेंनाच सर्वाधिक पसंती

विधानसभा निवडणुकांसाठी(political news) सर्वच पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. जवळपास सर्वच पक्षांचे उमेदवार जाहीर झालेत. मात्र, महायुती किंवा महाविकास आघाडीने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला नाही. अशातच आता सी वोटरचा सर्व्हे समोर आला. यात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती दर्शवण्यात आली.

विधानसभा निवडणुकांत(political news) महाविकास आघाडी बाजी मारणार की महायुती याची उत्सुकता सर्वांना लागली. महायुती आणि महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. तर महाविकास आघाडीत ठाकरे गट मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहे.

मात्र, महाविकास आघाडी सत्तेत येणार की महायुती हे 23 नोव्हेंबरनंतर स्पष्ट होणार आहे. अशातच सी-व्होटरचा सर्व्हे समोर आला. मतदारांनी मुख्यमंत्री म्हणून कोणत्या नेत्याला सर्वाधिक पसंती दिली, याबाबत या सर्वेक्षणातून माहिती समोर आली. एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक पसंती मिळाली. सी-वोटर सर्व्हेनुसार शिंदे पहिल्या क्रमांकावर उद्धव ठाकरे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

विशेष म्हणजे, पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहिलेले देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर म्हणजे शरद पवार चौथ्या आणि अजित पवार पाचव्या क्रमांकावर आहेत. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तुलनेत लोकांनी शरद पवारांना पाठिंबा दिला होता. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना कमी पसंती मिळाली.

एकनाथ शिंदेंना 27.5 टक्के लोकांनी पसंती दर्शवली. शिंदेंना मुंबईतील 25.3 टक्के, कोकणातील 36.7 टक्के लोकांनी पसंती दर्शवली. तर उद्धव ठाकरेंनी एकून 22.9 टक्के लोकांनी पसंती दर्शवली. त्यांना मुंबईतील 23.2 टक्के, कोकणातील 26.3 टक्के, मराठवाड्यातील 22.3 टक्के, उत्तर महाराष्ट्रातील 23.3 टक्के, विदर्भातील 23.2 टक्के आणि पश्चिम महाराष्ट्रातील 20.7 टक्के लोकांनी पसंती दर्शवली.

देवेंद्र फडणवीस यांना 10.8 टक्के मते मिळाली. फडणवीसांना मुंबईतील 14.8 टक्के, कोकणातील 10.4 टक्के, विदर्भातील 13.7 टक्के लोकांनी पसंती दिली. शरद पवारांना5.9 टक्के तर अजित पवारांना 3.1 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली.

हेही वाचा :

बापरे बाप! 3 रुपयांचा शेअर एका दिवसात थेट 2,36,250 रुपयांवर

यंदा तब्बल २८ लाख दिव्यांनी उजळणार ‘प्रभू श्रीरामां’ची अयोध्यानगरी

दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद रिषभ पंतने गमावले! कोणाला मिळणार कॅप्टन्सी