मोठी बातमी! प्रचाराला निघालेल्या ठाकरेंच्या ‘या’ उमेदवाराला हृदयविकाराचा झटका
विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात प्रचाराला सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी(candidate) आपले अर्ज देखील मोठं शक्तीप्रदर्शन करत दाखल केले आहेत. अशात प्रचाराला निघालेल्या ठाकरे गटाच्या उमेदवाराला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
जळगाव येथून चोपड्याला प्रचारासाठी जात असताना ममुराबाद गावाजवळ त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने जळगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर एन्जोप्लास्टी करण्यात आली असून दोन ब्लॉकेज निघाल्याची माहिती समोर आली आहे.
रुग्णालयात प्रभाकर सोनवणे यांना बघण्यासाठी नातेवाईक मित्र परिवारासह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे.त्यांची प्रकृती सध्या ठीक असून ते रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. प्रभाकर सोनवणे यांना ठाकरे गटाच्या अगदी शेवटच्या यादीत उमेदवारी देण्यात आली.अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.
निवडणुकीसाठी ते प्रचाराला जात असतानाच अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. आता प्रभाकर आप्पा सोनवणे यांची तब्येत चांगली असून लवकरच बरे होऊन प्रचारामध्ये ते सहभागी होतील, अशी माहिती प्रभाकर सोनवणे यांचे चिरंजीव दिनेश सोनवणे यांनी दिली आहे.
दरम्यान, चोपडा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे आणि उद्धव ठाकरे गटाकडून प्रभाकर सोनवणे यांच्यात सामना होणार आहे. ठाकरे गटाने चोपडा विधानसभा मतदारसंघातून आधी राजू तडवी यांना उमेदवारी(candidate) दिली होती. मात्र, ऐनवेळी तडवी यांची उमेदवारी रद्द करून ती प्रभाकर सोनवणे यांना जाहीर झाली.
हेही वाचा :
सरकारी नोकर होण्याची मोठी संधी, तब्बल 65000 रुपये पगार मिळणार
मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
अजितदादा- फडणवीसांना धक्का! सीएमपदासाठी जनतेची एकनाथ शिदेंनाच सर्वाधिक पसंती