आज विनायक चतुर्थी, बाप्पा ‘या’ राशींच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येणार!
दैनिक राशिफळ(zodiac signs) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते. यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशींचे तपशीलवार वर्णन केले जाते.
ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य(zodiac signs) तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
त्यानुसार आज 5 नोव्हेंबरचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल, याबाबतचे राशीभविष्य खाली दिले आहे. आज कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी आहे. चतुर्थी तिथी मंगळवारी रात्री 12 वाजून 17 मिनिटांपर्यंत राहील. त्याचप्रमाणे आज राहू काळ 3 वाजता सुरु होईल ते संध्याकाळी 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल. पंचांगानुसार चतुर्थी तिथी महिन्यातून दोनदा येते. एक शुक्ल पक्षात, तर दूसरी कृष्ण पक्षात. त्यानुसार, आज 5 नोव्हेंबर रोजी विनायक चतुर्थी साजरी केली जाणार आहे.
मेष:- आजचा दिवस संमिश्र असेल. भविष्याची फार चिंता करू नका. नातेवाईकांशी मन मोकळेपणाने बोलाल. सकारात्मक विचार नवीन बदल घडवतील. आज तुम्हाला शिक्षणासंबंधी मोठी संधी मिळेल. बाप्पाच्या कृपेने तुम्हाला आज धनलाभ देखील होऊ शकतो.
वृषभ:- जोडीदारासोबत प्रेमळ क्षण घालवाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आनंददायी अनुभव येतील. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. आजचा अंतिम निर्णय तुमचा असेल.
मिथुन:- खूप दिवसांपासून सुरू असलेला कामाचा शोध चांगल्या पगारासह पूर्ण होईल. तुम्हाला नवीन संधी प्राप्त होतील. कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता. महिला वर्गाला आज शुभ वार्ता ऐकायला मिळेल. आवडत्या व्यक्तींची गाठ पडेल.
कर्क:- एखादे चांगले पुस्तक वाचनात येईल. आवडता छंद पूर्ण करता येईल. बाप्पा तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. तुमचा आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल. खूप दिवसांपासून सुट्ट्यामध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन तुम्ही या दिवसांत पूर्ण कराल.
हेही वाचा :
ऐन विधानसभा निवडणुकीत ‘या’ दोन नेत्यांनी सोडली शरद पवारांची साथ
काँग्रेसला डबल झटका, आधी रवी राजा, मग विद्यमान आमदारानेही पक्ष सोडला, शिवसेनेत जाहीर प्रवेश
धोनीनेच शोधला आपला उत्तराधिकारी? ऋतुराज नाही तर ‘या’ नावाबद्दल CSK मॅनेजमेंटशी केली चर्चा