ट्रम्पचा ॲरिझोनामध्ये विजय: रिपब्लिकनने सातही स्विंग राज्ये केली काबीज

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या(America) राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्र्म्प यांनी पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला आहे. आता आणखी एक नवीन आकडेवारी समोर आली आहे. डोनाल्ड ट्र्म्प यांनी ॲरिझोनामध्येही विजय मिळवला आहे. या विजयासह रिपब्लिकन पक्षाने सातही स्विंग राज्यांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. याआधीही 2020 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी ॲरिझोना मध्ये विजय मिळवला होता. मात्र आता ट्रम्प यांनी हे राज्य जिंकत आपला प्रभाव कायम ठेवला आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, ट्रम्प यांना या निवडणुकीत 312 इलेक्टोरल मते मिळाली आहेत. हा आकडा ट्रम्प यांना 2016 च्या निवडणुकीत मिळालेल्या 304 मतांच्या आकड्यापेक्षा अधिक आहे. अमेरिकेत(America) राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी किमान 270 इलेक्टोरल मतांची आवश्यकता असते. यामुळे ट्रम्प यांच्या या यशाने रिपब्लिकन पक्षाचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. तर दुसरीकडे, या निवडणुकीत ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी, डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाची उमेदवार कमला हॅरिस यांना केवळ 226 इलेक्टोरल मते मिळाली आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, रिपब्लिकन पक्षाने यावेळी मिशिगन, जॉर्जिया, पेनसिल्व्हेनिया, विस्कॉन्सिन, आणि ऍरिझोनासह स्विंग राज्यांवर नियंत्रण मिळवत, नेवाडा आणि नॉर्थ कॅरोलिनासारखी महत्त्वाची राज्येही जिंकली आहेत. या विजयामुळे अमेरिकेत मोठ्या राजकीय उलथापालथी घडवून आणणारे परिणाम दिसू लागले आहेत. ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत वाढ होत असून रिपब्लिकन पक्षाच्या पुढील धोरणांवरही याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

सिनेटवरही रिपब्लिकन पक्षाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाने 52 जागा जिंकल्या आहेत, तर डेमोक्रॅटिक पक्षाकडे 47 जागा आहेत. प्रतिनिधीगृहात बहुमत मिळवण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या रिपब्लिकन पक्षाने 216 जागा जिंकल्या आहेत, बहुमतासाठी त्यांना केवळ दोन जागांची आवश्यकता आहे. हे यश रिपब्लिकन पक्षाच्या आगामी धोरणांसाठी निर्णायक ठरणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान सीमा सुरक्षा, इमिग्रेशन आणि बेकायदेसीर घुसखोरी या मुद्यांवर भर दिला होता. तसेच अमेरिकेत वाढत्या अवेध स्थलांकरांमुळे आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे ट्रम्प यांच्या अनेक सभांमधून बोलले गेले. ट्रम्प यांच्या आश्वासनानुसार, सत्तेत परतल्यास त्यांनी अमेरिका-मेक्सिको सीमेला सुमारे 10 हजार सैनिकांची सुरक्षा दिली जाईल.

तसेच अवैध स्थलांतरितांवर कठोर कारवाई केली जाईल. या विजयासह डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून 20 जानेवारीला शपथ घेणार आहेत. ट्रम्प यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाने मिळवलेले हे यश अमेरिकेच्या पुढील राजकीय वातावरणासाठी निर्णायक ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा :

…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांनी कोणाला दिला इशारा?

‘भारत नाही आला तर…’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची टीम इंडियाला धमकी

आधी लाडक्या बहि‍णींना भर सभेत धमकी नंतर जाहीर माफी, धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?