महादेवाच्या कृपेने आज ‘या’ राशींची इच्छापूर्ती होणार!

आज 11 नोव्हेंबररोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी आहे(rashi). दशमी तिथी सोमवारी संध्याकाळी 6 वाजून 47 मिनिटांपर्यंत चालेल. 11 नोव्हेंबर रोजी रात्रीपर्यंत रवि योग राहणार आहे.

तर राहू काळ पहाटे 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते 9 वाजेपर्यंत असेल. आता आठवड्याची सुरुवात कोणत्या राशीसाठी(rashi) कशी असणार, ते पाहुयात.

मेष : आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्य मदत करतील. मनात असलेली इच्छा महादेवाच्या कृपेने पूर्ण होईल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. तुम्ही घेतलेली मेहनत वाया जाणार नाही. आज तुम्हाला शुभ वार्ता ऐकायला मिळेल.

वृषभ : आज नोकरीच्या ठिकाणी तुमचे गुणगान होईल. सामाजिक सेवेत हातभार लावाल. दिवस हसत-खेळत जाईल. मित्रांची ऐनवेळी मदत मिळेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. रात्री मित्रांसोबत स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्याल.

मिथुन : इतरांच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. यामुळे दिवसभर चिडचिड कराल. योग साधनेला अधिक प्राधान्य द्यावे. कामानिमित्त दूरचा प्रवास संभवतो. व्यावसायिक लोकांनी प्रवासात काळजी घ्यावी. मौल्यवान वस्तु चोरी होऊ शकते. त्यामुळे आपल्या सामानाची काळजी घ्या.

कर्क : काही गोष्टींचा अति जास्त विचार कराल. जिथे घडलेली गोष्ट तिथेच सोडून द्या. अति विचार करण्यात मग्न राहाल तर इतर गोष्टींवर नकारात्मक परिणाम घडू शकतो. मानसिक तोल सांभाळावा. एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

सिंह : व्यावसायिक लोकांनी सावधपणे वागावे. कोणावरही विसंबून राहू नका. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. जोडीदाराची प्रगती खुश करणारी असेल. लहान व्यवसायिकांना लाभदायक दिवस. विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी चालून येतील.

कन्या : तुम्ही घेतलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल. महादेव तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. तुमचे कोणतेही काम अडकणार नाही. तुम्हाला आज अचानक धनलाभ होण्याची देखील संभावना आहे. एकंदरीत आजचा दिवस आनंदी जाईल.

हेही वाचा :

समरजीत घाटगेंसाठी कोल्हापूरकर मैदानात; ‘या’ संघटनांनी दिला जाहीर पाठिंबा

ऐन निवडणुकीत ठाकरे सेनेचा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा; महाविकास आघाडीत खळबळ

आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा