काँग्रेसचा बंडखोरांना दणका, ‘या’ नेत्यांना दाखवला बाहेरचा रस्ता
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. मात्र, अनेक ठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने महायुतीसह महाविकास आघाडीमध्येही मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं दिसून आलं. अशा बंडखोरांवर पक्षांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. कॉँग्रेससह(Congress) भाजपने काही दिवसांपूर्वीच बंडखोर नेत्यांची हकालपट्टी केली होती. अशात कॉँग्रेसने पुन्हा काही बंडखोर नेत्यांवर मोठी कारवाई केली आहे.
कॉँग्रेसने(Congress) पुन्हा एकदा 7 बंडखोर उमेदवारांवर कारवाई केली आहे. बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यापूर्वी 21 नेत्यांना निलंबित करण्यात आलं होतं. आता आणखी 7 नेत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
काँग्रेसने आतापर्यंत एकूण 28 बंडखोरांची हकालपट्टी केली आहे. यात रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक, काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार, पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.
सिंदखेडामध्ये बंडखोरी केलेले शामकांत सनेर, श्रीवर्धनमध्ये राजेंद्र ठाकूर, पर्वती विधानसभामध्ये बंडखोरी केलेले आबा बागूल, शिवाजीनगर येथून बंडखोरी करत अर्ज भरणारे मनीष आनंद, परतूरमधून सुरेशकुमार जेथलीया, कल्याण बोरडे, रामटेकमधून चंद्रपाल चौकसे यांना पक्षातून निलंबित करण्यात आलंय.
यासोबतच जयश्री पाटील यांना देखील निलंबित करण्यात आलंय. सांगलीत काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्याने त्या नाराज झाल्या होत्या. त्यांनी अपक्ष म्हणून आता पृथ्वीराज पाटील यांना आव्हान दिलं आहे. तर, जयश्री पाटील यांना खासदार विशाल पाटील यांनीही समर्थन दिलं आहे.
हेही वाचा :
समरजीत घाटगेंसाठी कोल्हापूरकर मैदानात; ‘या’ संघटनांनी दिला जाहीर पाठिंबा
ऐन निवडणुकीत ठाकरे सेनेचा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा; महाविकास आघाडीत खळबळ
आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा