राज्यात नवीन अभियान सुरु; “जो पाजील माझ्या नवऱ्याला दारु, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू”
विधानसभा निवडणुकीत नेतेमंडळी जोरदार प्रचार करत आहेत. अशातच आता उमेदवार(candidate) कार्यकर्त्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेतेमंडळी व कार्यकर्ते जोरदार प्रचार आहेत. मात्र आता राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनोखे अभियान सुरु झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान मुक्ती पथमार्फत अभियान सुरु केले आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांनी या मुक्ती पथ ही संस्था सुरु केली आहे. या संस्थेने राज्यातील महिलांना आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी बॅनर देखील लावले आहेत.
यावेळी गडचिरोली जिल्ह्यात ‘जो पाजील माझ्या नवऱ्याला दारु, त्या उमेदवाराला(candidate) नक्कीच पाडू’ असे अभियान सुरु केले आहे. मात्र आता त्याचे बॅनर देखील अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत.
याशिवाय या विधानसभा निवडणुकीत जो उमेदवार दारू पाजेल किंवा दारू वाटप करेल त्या उमेदवाराला नक्कीच पाडा असे आवाहन देखील डॉक्टर अभय बंग यांच्याकडून करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागासह सर्वत्र दारु बंदीसाठी जनजागृती आणि समुपदेशनचे काम ही संस्था करत आहे.
एकूण गडचिरोली जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ आहेत. त्यामध्ये गडचिरोली, आरमोरी, अहेरी या मतदार संघांचा समावेश होत आहे. मात्र आता मुक्तीपथ मार्फत अनेक बॅनर लावलेले दिसत आहेत.
हेही वाचा :
एकाने बायको उभी केली तर दुसऱ्याने बाबू उभा केला; बच्चू कडू
मतदारसंघातील CM एकनाथ शिंदेंची सभा रद्द झाली, उमेदवाराला फुटला घाम!
संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर झाला मुलगी? Viral Video ने केलाय बवाल