“सरकार स्थापनेसाठी शरद पवार आणि भाजपात..”; अजित पवारांचा महागौप्यस्फोट
राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात(political circle) सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू आहेत. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 5 वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019 विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर जे घडलं, त्याबाबत अजित पवारांनी मोठा खुलासा केलाय. यावेळी त्यांनी उद्योगपती अदानींचा देखील उल्लेख केलाय. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
2019 मध्ये पहाटेचा शपथविधी सर्वांनाच ठाऊक आहे. अजित पवार यांनी त्यावेळी पहिल्यांदा भाजपासोबत सरकार बनवलं होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार(political circle)) उपमुख्यमंत्री बनले होते. अशात अजित पवारांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या प्रसंगाबाबत एक खुलासा केलाय. पाच वर्षांपूर्वी गौतम अदानी, भाजप आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक झाली होती, असं अजित पवार म्हणाले आहेत.
“अमित शाह, गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि पवार साहेब सगळेच त्या बैठकीला हजर होते”, असं अजित पवार म्हणाले आहेत. दिल्लीत एका व्यापाऱ्याच्या घरी बैठक झाली, हे सर्वांना माहित आहे. पाच बैठका झाल्या. अमित शाह, गौतम अदानी तिथे होते.
प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस, पवार साहेब सुद्धा होते. सर्व निर्णय झाले होते, असा खुलासा अजित पवार यांनी केलाय. यावर शरद पवार मग भाजपासोबत का नाही गेले?, असा प्रश्न अजित पवारांना मुलाखतीमध्ये करण्यात आला. यावर अजित पवार म्हणाले की, शरद पवार असे नेते आहेत की त्यांच्या डोक्यात काय चाललय हे कोणालाही समजू शकत नाही, अगदी त्यांच्या पत्नीला सुद्धा नाही.
दरम्यान, 2019 मध्ये सरकार बनवण्यासाठी भाजपासोबत चर्चा केल्याचे दावे शरद पवारांनी कायमच फेटाळले आहेत. तर 2017 ते 2019 दरम्यान शरद पवार यांनी भाजपासोबत अनेकदा बैठका घेतल्या असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांनी अनेकदा याबाबत बोलून दाखवलं आहे. अशात स्वतः अजित पवार यांनीच बैठकांचा उल्लेख केल्याने याची आता राजकारणात चर्चा रंगते आहे.
यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते. “स्वत: अजित पवार कबुल करत आहेत की महाराष्ट्रातील सरकार गौतम अदानींनी पाडलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडण्यामागे सुद्धा नरेंद्र मोदी आणि अदानी यांची हातमिळवणी आहे.”, असं राऊत म्हणाले.
अजित पवार यांनी स्वतः अदानी बैठकीत असल्याचं म्हटलं आहे. आता या बैठका नेमक्या कधी झाल्या, त्यात काय चर्चा झाली असावी?, तसेच या बैठकांमध्ये अदानी यांची हजेरी का होती?, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
संपूर्ण कर्जमाफी आणि कृषिपंपांना मोफत वीज…; भाजपने शेतकऱ्यांसाठी केली मोठी घोषणा
शरद पवारांनी टाकला बुद्धीबळाचा डाव, निवडणुकीच्या मैदानात शेवटची बाजी
कोल्ड्रिंकमध्ये नशेचं औषध टाकून तरूणीवर केला अत्याचार; व्हिडिओही काढला अन् तब्बल चार वर्षे…